महान तपस्वी दधीची ऋषी यांची जयंती बेलापुरात साजरी
बेलापुर( प्रतिनिधी — देवीदास देसाई )
-येथील श्री. जुने बालाजी मंदिर या ठिकाणी महाज्ञानी महान तपस्वी त्याग मूर्ति महर्षि दधीची ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी महर्षी दधिची ऋषीच्या प्रतिमेचे पुजन करुन महा आरती करण्यात आली या वेळी सौ. मीना दिलीप दायमा यांच्या सह उपस्थित महिला व दायमा समाजाच्यावतीने आरती करण्यात आली. या वेळी शिव नारायण दायमा, रमेश दायमा, पत्रकार दिलीप दायमा, योगेश दायमा, किशोर दायमा, श्रीवल्लभ दायमा, रणजित श्रीगोड, राहुल दायमा, किशोर जोशी, गोविंद श्रीगोड प्रकाश देसर्डा, सर्वसौ लीला बाई दायमा, मंगल बाई दायमा, शारदा दायमा,शांता दायमा, स्नेहल दायमा,मनिषा दायमा, भावना दायमा, कु. प्रेरणा दायमा,कृपा दायमा,पुर्वी दायमा,आरती दायमा कु.प्रेरणा दायमा आदिसह दधीची समाज व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.