खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल माळवाडगाव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना हिंदुस्तान कॅटल फीड कंपनी तर्फे वहयांचे वाटप
प्रतिनिधी…(ज्ञानेश्वर अनुसे)
खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल माळवाडगाव विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज हिंदुस्थान कॅटल फीड कंपनी ने त्यांचा सीएसआर फंडातून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळ पास 1400 वह्या अंदाजे रु.24000/- किमतीचे वाटप करण्यात आले. या वेळी कंपनी चे मार्केटिंग ऑफिसर मा.श्री.धीरज बोरसे साहेब व मा. श्री यमनाथ पा.आसने , उपसरपंच श्री.शामराव आसने , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. सुनिल भाऊ आसने , जि. प.प्रा.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.जालिंदर आसने तसेच ग्रामस्थ श्री.सुरेश आसने ,श्री सुनिल आसने , बाळासाहेब आसने, डॉ. केशव आसने, दिनेश आसने,श्री अनंत डाखे, सुनील शिंदे आदी. मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्थे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय खा.गोविंदराव आदिक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नाईक सर ,ज्येष्ठ शिक्षक श्री कालांगडे सर श्री उंडे सर,शेख सर, भांड सर, तुकाराम चौधरी मामा सौ.थोरात मॅडम, सौ.शीरसाठ मॅडम, उंडे मॅडम ,खर्डे मॅडम, आसने मॅडम जि.प. प्रा. शाळेचे मुख्याध्यपक श्री मंतोडे सर पाचपिंड सर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी आदी. उपस्थित होते.