विरोधकांना आपण केलेल्या विकास कामांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही – आ. कानडे
प्रतिनिधी -इमरान शेख
श्रीरामपूर – विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. ही कामे करताना पारदर्शकता ठेवून कामे दर्जेदार कसे होतील, याकडे लक्ष दिले. याउलट विरोधकांनी नगरपालिकेच्या सत्तेतून केवळ ठेकेदारांना पोसण्याचे काम केले. त्यांना आपण केलेल्या विकास कामांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीनिमित्त मतदार संघातील आंबी, केसापूर, अमळनेर, चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, दरडगाव या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेतून आ. कानडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, अमृत काका धुमाळ, उद्योजक अंकुश कानडे, राष्ट्रवादीचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, युवक अध्यक्ष संदीप चोरगे, राज्य प्रतिनिधी सुनील थोरात, राहुरी बाजार समितीचें माजी सभापती वेनुनाथ कोतकर या प्रचार दौऱ्यात होते.
आ. कानडे म्हणाले, मतदारसंघात विकास कामे करताना गटतट भेदभाव केला नाही. मतदार संघातील बहुतेक सर्व तलाठी कार्यालये बांधली. श्रीरामपूर बेलापूर महाबळेश्वर नेवासा रस्त्याचे चौपदरीकरण केले. एमआयडीसीमध्ये 220 केवीचे विज उपकेंद्र मंजूर केले. शेतकऱ्यांचे पाटपाणी विजेचे प्रश्न सोडविले युवकांसाठी नोकरी मेळावा घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. मतदार संघात सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी आणून विकास कामे केली. कार्यारंभ आदेश आल्याशिवाय उद्घाटने करायची नाही, कामाच्या ठिकाणी अंदाजपत्रकांचा फलक लावायचा, अशा पद्धतीने पारदर्शक काम करून भ्रष्टाचाराला वाव दिला नाही. या उलट विरोधकांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांना मोठे करण्याचे काम केले. कामाचा दर्जा राखला नाही. आपल्या विकास कामात वाटा न मिळाल्याने त्यांनी कटकारस्थान करून आपली उमेदवारी कापली. त्यामुळे त्यांना आपल्या विकास कामांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले.
अविनाश आदिक म्हणाले, आ. कानडे यांनी प्रशासनातील कामातील अनुभवामुळे योजना गतिमान व कृतिशील केल्या. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, महिलांचे प्रश्न विधानसभेत पोटतिडकीने मांडून विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. अशा चांगल्या काम करणाऱ्या आमदाराचे तिकीट कापले गेल्याने सर्वच पक्षांचे त्याकडे लक्ष गेले. परंतु आ. कानडे यांनी शाहू फुले आंबेडकर विचारांशी जोडले गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना निवडून आणण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनीही आपल्या भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी सरपंच दादासाहेब मेहत्रे, दीपक पवार, सरपंच गणेश कोतकर, सरपंच ॲड. पूजा लावरे, सरपंच गीताराम साळुंके, सरपंच बाळासाहेब साळुंके, सरपंच दत्तात्रय खर्डे, राजेंद्र खैरे, विलास रणदिवे, मच्छिंद्र पवार, अजय भोसले, राजेंद्र पवार, बाप्पू बनसोडे, संजय पुंड, गोरक्षनाथ खेमनर, संजय टाकसाळ, भानुदास कापसे, बाळकृष्ण मेहत्रे, भागवतराव कोळसे, रावसाहेब सालवंदे, अच्युतराव जाधव, हरिभाऊ साळुंखे, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब रोडे, नंदकुमार जाधव, सुनील लोंढे, रोहन जाधव, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष चांगदेव देवराय, गोरक्षनाथ खेमनर, संजय टाकसाळ, संजय पुंड, बापू बनसोडे, भानुदास कापसे, बाळकृष्ण मेहत्रे, रवींद्र राजूळे, कैलास लावरे, सुनील शिंदे, किशोर शिंदे, राजेंद्र काळे, संदीप गल्हे, सचिन कोळसे, परसराम शिंदे, इस्माईल सय्यद, बबन शिंदे, गोरक्षनाथ जाधव, अविनाश शिंदे, गोरक्षनाथ बोंबले, विजय जाधव, मोहम्मद शेख, लहानु शिंदे, पाराजी गडाख, शिवाजी जाधव, बापूसाहेब तुपे, दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय गडाख, लक्ष्मण जाधव, चंद्रभान शिंदे, खंडेराव शिंदे, भागवत जाधव, आयुब सय्यद आदिसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…….