समाजसेवेच्या नावाखाली राजकारणाचा धंदा करून जनतेला फसविणाऱ्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये – आ. कानडे

 

श्रीरामपूर प्रतीनीधी – इमरान शेख

गेली बारा वर्षापासून या शहरामध्ये राहतो, परंतु मी ना इथे प्लॉट घेतला ना इमारती बांधल्या. परंतु अनुराधा आदिक नगराध्यक्ष होण्यापूर्वी ज्यांनी जनतेमध्ये जाण्याच्या नावाखाली गोड बोलून प्लॉट हडप केले, याची श्रीरामपूरकरांना चांगली माहिती आहे. शेती महामंडळाच्या वाटप झालेल्या जमिनीमध्ये शहराच्याजवळ सुमारे पन्नास/ शंभर एकर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कोणी खरेदी केल्या, हेही जनतेला सांगितले पाहिजे. समाजसेवेच्या नावाखाली राजकारणाचा धंदा करून ज्यांनी जनतेला फसवले त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. शहरासाठी आलेली 60 कोटीची भुयारी गटारी योजना प्रत्यक्षात जमीन नसताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधल्याचे दाखवून कोट्यावधी रुपये हडपले व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जे तोंड लपवत फिरले आणि आता जामिनावर बाहेर पडले. त्यांना तर भ्रष्टाचारावर बोलण्याचा मुळीच अधिकार नाही, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग ५ मधील शेळके हॉस्पिटल समोर, प्रभाग ६ मध्ये सरस्वती कॉलनी व प्रभाग १६ मध्ये गौतमनगर अभिजीत यांच्या घरासमोर झालेल्या कॉर्नर सभेत आ. कानडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील, राज्य प्रतिनिधी सुनील थोरात, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, माजी नगरसेवक राजेंद्र पानसरे, रवी पाटील, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, कविता कानडे, भाजपाच्या पूजा चव्हाण, रुबीना पठाण, निलेश भालेराव यावेळी उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, गेल्या पाच वर्षात आपण मतदार संघात सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी आणून विकास कामे केली. कार्यारंभ आदेश आल्याशिवाय उद्घाटने करायची नाही कामाच्या ठिकाणी अंदाजपत्रकांचा फलक लावायचा अशा पद्धतीने पारदर्शक काम करून भ्रष्टाचाराला वाव दिला नाही. या उलट विरोधकांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांना मोठे करण्याचे काम केले. कामाचा दर्जा राखला नाही. भुयारी गटार योजनेचे काय झाले तसेच शेती महामंडळाच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कोणी हडप केल्या, हे सर्व जनतेला माहित आहे. आपल्या विकास कामात वाटा न मिळाल्याने त्यांनी कटकारस्थान करून आपली उमेदवारी कापली त्यामुळे आपल्या विकास कामांबद्दल तसेच भ्रष्टाचारावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही असे ते म्हणाले.

अविनाश आदिक म्हणाले, आ. कानडे यांनी मतदार संघात तसेच माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात नियमानुसार व पारदर्शकपणे विकास कामे केली. त्यांनी कधीही ठेकेदारांचे हित जोपासले नाही. अशा पद्धतीने काम करणाऱ्या आ. कानडे यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, निलेश भालेराव यांची भाषणे झाली.

यावेळी हंसराज आदिक, नितीन गवारे, निखिल सानप, राधाकिसन पठारे, प्रदीप महांकाळे, विजय पांडागळे, राजू शेजुळ, अनिल महांकाळे, संजय महांकाळे, आकाश मीरपगार, प्रशांत कसबे, दीपक तेलोरे, राहुल बोंबले, रोनित घोरपडे, पप्पू भोसले, मनोज शेळके, नारायण छल्लारे, अनिल चव्हाण, रमेश घुले, वामन चोथे, रामदास देवकाते, रामकिसन देवकाते, रामकिसन वाघ, अब्दुल शेख, सदा कावडे, अनिल देवकर, अक्षय चव्हाण, निलेश शेडे, श्रीराम माळवे, बबन गोरे, प्रकाश चव्हाण, एकनाथ वाघ, रामभाऊ वानखेडे, श्री. डहाळे, श्री. चावरे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला व उपस्थित होते.

………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!