हिंदू एकता आंदोलन पक्षाकडून आ. लहु कानडे यांच्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी
प्रतिनिधी -इमरान शेख
श्रीरामपूर – हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेद्वार लहु कानडे यांना श्रीरामपूर शहर व तालुक्याच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच गोंडेगाव येथील सकाळी ८ वा. बुधनिहाय मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. तसेच महायुतीचे लहु कानडे यांना येणार्या २० तारखेला जास्तीत जास्त मतदान करुन निवडुन द्यावे, असे असंख्य कार्यकर्ते व गोंडेगाव येथील ग्रामस्थ यांना बरोबर घेवुन फेरी काढण्यात आली.
पंतप्रधान ग्रामसडक तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेमार्फत गाव तेथे रस्ते करण्यात आले. तसेच आ. कानडे यांच्याकडे सरकारकडुन निधी कसा उपलब्ध करुन घ्यायचा ही मोठी चिकाटी असुन ५ वर्ष त्यांना संधी दिल्यामुळे आ. कानडे यांनी श्रीरामपूर तालुका मतदारसंघात १२०० कोटीचा निधी आणुन मोठ्या प्रमाणात विकास केला. कालच श्रीरमापूरमध्ये अजित पवार यांची सभा झाली. त्या सभेत श्री .प्वार्यांनी सांगितले आ. कानडे यांना श्रीरामपूर मतदारसंघातुन तुम्ही भरघोस मतांनी निवडुन द्या, मी शब्द देतो की, मी आपल्या मतदार संघात ३००० कोटीचा निधी दिल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. हे आम्ही गावोगावी मतदारांना सांगुन हिंदुएकता पक्षाच्यावतीने जनगागृती करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे यांनी सांगितले.
तसेच नायगाव, नाउर, जाफ्राबाद, मातुलठाण, टाकळीभान, मालुंजा, खोकर, भोकर, दिघी, खैरी, माळेवाडी, महंकाळवाडगाव या गावांत कार्यकर्ते घेऊन फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये गोंडेगाव येथील गजाबापु फोफसे, शंतनु फोफसे, बाबासाहेब कोळसे, मारुती फोफसे, ज्ञानदेव हरगुडे, भिकनभाई शेख, प्रभाकर फोफसे, गिताराम पोकरे, विजय फोफसे, तुळसीदास नेवसे, अरुण नेवसे, दिलावर सय्यद, तसेच प्रदेश संघटक मनोहर बागुल, जिल्हाप्रमुख विजय जगताप,जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष शिवाजी फोफसे, शहराध्यक्ष बी. एम. पवार, जिल्हा संघटक सोपानराव पागिरे, जिल्हा उपाध्यक्ष गुरू भुसाळ, जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, जिल्हा शेतकरी हिंदु एकता आघाडीप्रमुख जे. एम. वाकचौरे, अविनाश कनगरे, जयराम क्षिरसागर, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब आगळे, अण्णा लष्करे, उमेश सुपेकर, विजूभाऊ पंडोरे, प्रसाद गाढे, दत्तात्रय गाढे यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली.
……………