भोकर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
झेंडा व प्रतिमेची मिरवणुक, अभिषेक व अन्नदान सोहळा संपन्न.

भोकर( प्रतिनिधी–चंद्रकांत झुरंगे )

– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे प्रभु श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. येथील धर्मविर प्रतिष्ठानसह ग्रामस्थांनी मिरवणूकीने जन्मोत्सव साजरा केला तर येथील प्रभु श्रीराम मंदिर येथे पटारे परीवाराचे वतीने श्रीराम, सिता व लक्ष्मण यांना अभिषेक करत महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.
येथील धर्मविर प्रतिष्ठानचे वतीने प्रभु श्रीराम यांचे प्रतिमेची व झेंड्याची मिरवणुक काढण्यात आली. श्रीरामपूर- नेवासा राज्य मार्गालगत भोकर बसस्टॉप येथून मिरवणुकीस सुरूवात झाली. गावातील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिराजवळील भवानी चौक व नंतर गावातील मुख्य प्रदिक्षीणा मार्गाने येथील श्रीराम मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
या वेळी उपसरपंच सागर आहरे, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊराव सुडके, सतीष शेळके, राजेंद्र चौधरी, दिपक शेळके, ग्रामपंचायत सदस्य गीरीष मते, संदिप गांधले, मयुर काळे, काळू गायकवाड आदिंमान्यवर या मिरवणूकीत सहभागी झाले होते. तसेच धर्मविर प्रतिष्ठाणचे अक्षय मते, गिरीष मते, आशुतोष काळे, अनिकेत आबुज, हरीभाऊ पटारे, नवनाथ मते, प्रकाश आबुज, राहुल गायकवाड, सोहेल शेख, विक्रांत झिने, राहुल मते, कृष्णा शिंदे, ऋषीकेष ढाले आदिंसह युवक सहभागी झाले होते.
तर येथील श्रीराम मंदिर येथील सोहळ्यात सरपंच सौ. शितलताई पटारे, भागवतराव पटारे, रामदास शिंदे, असंघटीत कामगार संघटेनेचे जिल्हा सचीव गणेश छल्लारे, सोसायटीचे अध्यक्ष आण्णासाहेब काळे, प्रताप पटारे, वेणुनाथ डूकरे, कारभारी तागड, सेनेचे सदाशिव पटारे, दत्तात्रय पटारे, बाळासाहेब विधाटे, पंढरीनाथ मते, सागर शिंदे, दिलीप पटारे, सचीन पोखरकर, गणेश कांबळे, राजीव तागड, सुनिल वाकडे, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड, नानासाहेब तागड, भानुदास बेरड, बाबासाहेब तागड, नामदेव पटारे, संपतराव पटारे, पोपटराव पटारे, योगेश आबुज, दिनकर चव्हाण, सिताराम लोखंडे आदिंसह मान्यवर ग्रामस्थांसह अबालवृद्ध व महिला उपस्थीत होत्या.
भोकर येथील श्रीराम मंदिर येथे येथील पटारे परीवाराचे वतीने आण्णासाहेब पटारे व सौ.आण्णासाहेब पटारे या दाम्पत्याने विधीवत पुजन करत अभिषेक करून जन्मोत्सव साजरा केला. यावेळी आण्णासाहेब पटारे परीवाराच्यावतीने महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले.
यावेळी धर्मविर प्रतिष्ठानचेवतीने गेल्या वर्षापासून दर शनिवारी येथील हनुमान मंदिर येथे सुरू असलेल्या हनुमान चालीसा सोहळ्यात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन येथील युवकांनी केले.

भोकर येथे श्रीराम जन्मोत्सवानिमीत्ताने आयोजीत मिरवणुकीत सहभागी झालेले भाऊराव सुडके, सतीष शेळके, राजेंद्र चौधरी, दिपक शेळके, गीरीष मते, संदिप गांधले, मयुर काळे, काळू गायकवाड, अक्षय मते, गिरीष मते, आशुतोष काळे, अनिकेत आबुज, हरीभाऊ पटारे, प्रकाश आबुज, राहुल गायकवाड, सोहेल शेख, विक्रांत झिने, राहुल मते, कृष्णा शिंदे, ऋषीकेष ढाले आदिंसह युवक दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!