जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते – डॉ शंकरराव मुठे

माळवाडगाव ( प्रतिनिधी –केशव आसने )

– मुठेवडगाव येथील गणेश संभाजी गोसावी यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून त्याची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल मुठेवाडगाव सोसायटी व दशनाम गोसावी समाज यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ.मुठे म्हणाले की ग्रामीण भागातील मुले सुद्धा आज कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नाही कारण की जिद्द आणि चिकाटी जर असेल तर कुठलही यश हमखास आपण संपादन करू शकतो आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एक शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य गोसावी समाजातील गणेश संभाजी गोसावी याने आपले शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पूर्ण करून कुठलेही क्लास न लावता इंजिनीयर पदवी घेऊन हे यश संपादन करून सिद्ध केले आहे.
यावेळी कारेगाव भागचे व्हा.चेअरमन शिवाजी मुठे सोसायटीचे चेअरमन संपतराव मुठे व्हा.चेअरमन बबन मुठे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मुठे,किशोर साठे,सोसायटी सदस्य भागवत मुठे,संभाजी गोसावी, रमेश मुठे,रंगनाथ कोळसे सर,सुभाषराव मुठे, अण्णासाहेब मुठे, शेषराव मुठे,प्रा.शिवाजी जासूद, भिकचद मुठे, अशोक चौधरी, लहानु मुठे,सर्कल बाबासाहेब गोसावी, सुनील गोसावी,सदाशिव गोसावी,शिवाजी गोसावी,बापू गोसावी, रामगिरी गोसावी,शरद जासूद,भागवत तांबे,सुरेश मुठे,आत्माराम मुठे, अनिल पाचपिंड,कचरू गोसावी,माजी उपसरपंच गणेश गोसावी सागर मुठे,सोसायटीचे सचिव दत्तात्रय जासूद, विलास खैरे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन महावितरणचे जालिंदर गोसावी यांनी केले तर आभार किरण मुठे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!