भोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान हनुमाण मंदिर येथे
मंदिर जिर्णोद्धार, मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा संपन्न

भोकर( प्रतिनिधी– चंद्रकांत झुरंगे )

– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील भोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या हनुमान मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला. त्यानिमीत्ताने येथील हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळा नुकताच नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील बहीरजात वेदमंदिर संस्थान येथील बालब्रम्हचारी महंत स्वामी विश्वनाथगीरीजी महाराज यांचे हस्ते संपन्न झाला.
भोकर परीसरातीलच नव्हेतर पंचक्रोषीत जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलले हे हनुमानमंदिर राज्यमार्ग रूंदीकरणामुळे राज्यमार्गालगत आलेले होते. यानंतरच्या रूंदीकरणात येथे मंदिराला जागा अपुरी व रहदारीचे दृष्टीने धोकादायक झाल्याने येथील ग्रामस्थ व तरूणांनी पुढाकार घेत या मंदिराच्या मागे असलेल्या झिने यांच्या शेतात लोकसहभागातून गेल्या वर्षीपासून येथील मंदिर उभारणी सुरू होती. लोकवर्गणी व लोक सहभागातून सुमारे 20 लाख रूपये खर्चून येथे सुंदर व आकर्षक मंदिराची उभारणी करण्यात आली.
येथील मंदिर जिर्णाद्धारानंतर नाशिक येथील सचीन कुलकर्णी व विनायक जोशी आदि पुरोहितांकरवी यथासांग पुजापाठ करत येथील भागवताचार्य संतोष महाराज पटारे यांचे प्रमुख उपस्थीतीत येथील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील बहीरजात वेदमंदिर संस्थान येथील बालब्रम्हचारी महंत स्वामी विश्वनाथगीरीजी महाराज यांचेहस्ते कलश रोहन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
याकामी येथील असंघटीत कामगार संघटेनेचे जिल्हा सचीव गणेश छल्लारे, भाजपाचे संचीत गिरमे, रविंद्र गिरमे, ज्ञानेश्वर झिने, सार्थक चौधरी, विलास चौधरी सतिष चौधरी, चंद्रकांत बेलदार, सुनिल मेहेत्रे, जितेंद्र चौधरी, भगवान पेरकर, अरूण मेहेत्रे, गोविंद आहेर, अनिकेत झिने आदिंसह परीसरातील तरूणांनी विशेष परीश्रम घेतले. योवळी येथील उद्योजक विलास अशोकराव चौधरी यांनी महाप्रसादाचे अन्नदान केले.या मंदिर उभारणीकामी तसेच मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलश रोहन या सर्व कार्याला परीसरातील, गावातील ग्रामस्थांसह अनेक भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने कमी वेळेत आकर्षक मंदिर उभारणी करून सर्व सोहळा संपन्न करणे शक्य झाल्याचे येथील आयोजकांनी सांगीतले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब जाधव, भारत छल्लारे, संदिप शिंदे, राजेंद्र गिरमे, जितेंद्र छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड, ज्ञानेश्वर कर्जुले, सिताराम खराडे, कैलास मेहेत्रे, सोमनाथ छल्लारे, सागर अमोलीक आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!