प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी मांसाहारी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

बेलापुर (प्रतिनिधी देविदास देसाई )

– अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीरामचंद्राच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ ( चिकन मटन मासे )विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासीक निर्णय बेलापुरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी घेतला असुन या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे . बेलापुर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांची प्रभु श्रीराम मंदिराच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच बेलापुरात आले असता मुस्लिम समाजाने त्यांना मस्जिदमध्ये नेवुन राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदु बांधवच्या उपवासाचे महत्व लक्षात घेवुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता . त्याच धर्तीवर बेलापुर ग्रामपंचायतीच्या वातीने बेलापूर बु ग्रामपंचायत कार्यालय येथे चिकन,मटन, मासे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने या दिवशी चिकन, मटण, मासे आदी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी विनंती उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना केली या विनंतीला मान देत सर्व व्यवसायीकांनी दिनांक २२ जानेवारी रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्राम विकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार,मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे, जुबेर कुरेशी, अबीद पठाण,रामू गुडे रज्जाक पटेल, मुझफर कुरेशी,कय्युम कुरेशी, उबेद कुरेशी, गोलू आतार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!