उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या
श्रीरामपूर तालुका औद्योगीक सेना तालुका प्रमुखपदी मच्छींद्र पटारे यांची नियुक्ती
भोकर(प्रतिनिधी-चंद्रकांत झूरंगे)
– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रगतशिल शेतकरी कुटूंबातील व श्रीरामपूर एम आय डी सी तील रेणुका हर्बल्सचे मच्छींद्र पटारे यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या श्रीरामपूर तालुका औद्योगीक सेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीरामपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे. मच्छींद्र रावसाहेब पटारे यांनी गेल्या 24 वर्षापुर्वी रेणुका हर्बल्स नावाने श्रीरामपूर एम आय डी सी मध्ये आयुर्वेदीक औषधांचा कारखाना सुरू केला हा उद्योग आजतागायत प्रगतीकडे वाटचाल करत आहे, त्याच बरोबर या पटारे परीवाराने येथेच रेणुका रिमीडीज़् नावाने पॅकेजींग उद्योगही सुरू केलेला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे यांचे निकटवर्ती म्हणून परीचीत असलेले मच्छींद्र पटारे यांना सामाजीक कार्याचा मोठा अनुभव व जनसंपर्क या मुळे हि संधी मिळाली आहे.
यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख सचीन बडधे, सुहास वहाडने, सदाशिव कराड, तालुका प्रमुख लखन भगत व राधाकीसन बोरकर, अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे व शांताराम तुवर, खोकरचे सदाशिव पटारे, मारूती शिंदे, बाळासाहेब पटारे आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.
या निवडीने सेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून विविध स्तरातून मच्छींद्र पटारे यांचे नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.