उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या
श्रीरामपूर तालुका शेतकरी सेना उपतालुका संघटक पदी भोकरचे मारूती शिंदे यांची नियुक्ती

भोकर(प्रतिनिधी-चंद्रकांत झुरंगे)

 

– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रगतशिल शेतकरी कुटूंबातील मारूती शिंदे यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या श्रीरामपूर तालुका शेतकरी सेना उपतालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीरामपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे. भोकर परीसरातील हनुमानवाडी शिवारातील मारूती दगडू शिंदे यांना गेल्या अनेक वर्षांचा राजकीय व सामाजीक कार्याचा अनुभव आहे. पंचक्रोषीत ग्रामीण राजकीय अभ्यासक म्हणून व एमडी या नावाने ते परीचीत आहेत.

यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख सचीन बडधे, श्रीरामपूर विधानसभा प्रमुख संजय छल्लारे, सुहास वहाडणेे, सदाशिव कराड, तालुका प्रमुख लखन भगत व राधाकीसन बोरकर, अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे व शांताराम तुवर, खोकरचे सदाशिव पटारे, औद्योगीक सेनेचे तालुका प्रमुख मच्छींद्र पटारे, बाळासाहेब पटारे आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!