अशोकनगर येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या दफनभूमीसाठी ग्रामपंचायती कडे जागेची मागणी

वडाळा महादेव [  प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर या ठिकाणी मागासवर्गीय दलित समाजाची मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असल्याने मागासवर्गीय दलित समाजाच्या व्यक्तीच्या दफनविधी करीता अत्यंत अडचण निर्माण होत आहे.
या विषयासंदर्भात निपाणी वडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. प्रशांत दर्शने व सरपंच सौ. सविता योगेश देवकर यांना दफनभूमीचे जागेच्या मागणीचे सह्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी निवेदन देताना प्रशांतराजे शिंदे,भारत वैरागर,रवींद्र अंकुश,
डॉ प्रवीणराजे शिंदे,सुखदेव साळवे,योगेश देवकर,विलास जाधव,अण्णा मोरे,जालिंदर उंडे, योगेश जाधव, अशोक बार्से, राहुल जाधव,संभाजी जाधव, संदीप तोरणे,चंद्रकांत येवले आदी उपस्थित होते. या विषया संदर्भात राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर, मा.उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर, व मा. तहसीलदार साहेब श्रीरामपूर यांना अशोकनगर येथील मागासवर्गीय समाजाचे एक शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटून जागेच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती श्री. प्रशांतराजे शिंदे व श्री भारत वैरागर यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!