महाराष्ट्र राज्य सरकारची एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे लबाड घरचे आवतन जेवल्या बिगर खरं नाही !! – नीलेश शेडगे
प्रतिनिधी — मुनीर सय्यद
सन 2023 -24 सालचा खरीप व रब्बी हंगाममधील सर्व पिकांचा समावेश करून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अ.नगर यांनी सुरू केलेल आंदोलन आता राज्यव्यापी आंदोलन झाले आहे,सुरुवातीला ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीने खरीप हंगाममधील फक्त सोयाबीन,मका या पिकांचे नुकसान भरपाई दावे मान्य केले होते तेव्हा आपण खरीप व रब्बी हंगाममधील सर्व पिकांचा पीकविमा नुकसानभरपाई मध्ये समावेश करून नुकसानभरपाई देण्यात यावी यासाठी 24 जून 2024 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय नगर येथे टाळे ठोकण्याच आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक श्री सुधाकर बोराळे यांनी तत्काळ दखल घेऊन 20 जून 2024 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक यांचे दालनात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने क्षेत्रीय प्रबंधक श्री विनायक दीक्षित आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीताताई वानखेडे, व संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते आशाताई महांकाळे,कोमल वानखेडे,पुष्पा घोगरे,सुनीता चोरमल ,शीतल पोकळे , मंदा गमे वर्षा वानखेडे, रुक्साना शेख, शिला चोरमल,प्रकाश जाधव , बाळासाहेब घोगरे ,श्रीराम त्रिवेदी,मधू काकड ,भानुदास चोरमल, रवी वानखेडे,नामदेव घोगरे,नवनाथ दिघे , सुदामराव आसने ,हौशिराम दांगट, अभिजित यादव यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत खरीप व रब्बी हंगाममधील सर्व पिकांना पीकविमा नुकसानभरपाई देण्याची मागणी मान्य करून 31 जुलैअखेर भरपाई देण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने लेखी दिले परंतु 31 जुलै पर्यंत खात्यावर पैसे जमा न झाल्याने 1 ऑगस्ट रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे टाळे ठोकण्याच आंदोलन करण्यात आले तेव्हा इन्शुरन्स कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक श्री विनायक दीक्षित यांनी आपल्याला लेखी पत्र दिले की केंद्र व राज्य सरकारकडे विमा कंपनीला एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेची सुमारे 2027 कोटी रुपयांची प्रीमियमची सबसिडी घेणे आहे ती 3 आठवड्यात सरकार देणार आहे आपण 21 ऑगस्ट रोजी विमा कंपनीचे अधिकारी यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी आपल्याला कळविले की सरकारने पैसे दिले नाहीत त्यामुळे विमा कंपनी शेतकऱ्यांना भरपाई देणार नाही सरकारमुळे विमा नुकसान भरपाई रखडली असल्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने नगर जिल्ह्यातील सर्व 12 आमदार 2 खासदार यांना निवेदन देऊन सरकारकडे पाठपुरावा करण्यास आवाहन केले होते आणि पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखेपाटील यांना प्रत्यक्ष भेटून सरकारकडून विमा कंपनीला 2027 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावेत यासाठी निवेदन देण्यात आले नगर जिल्ह्यातील सर्व आमदार , खासदार आणि पालकमंत्री यांनी त्यांचमुळे पीकविमा नुकसानभरपाई मिळाल्याची खोटी जाहिरातबाजी दोन महिनेपुर्वी केली पणं ऑगस्टअखेर पैसे जमा करू असे वेळोवेळी आश्वासन देऊनही सरकार आणि विमा कंपन्यांनी भरपाई दिली नाही पीकविमा नुकसानभरपाईसाठी संघर्ष आणि पाठपुरावा करत असताना असे लक्षात आले की सरकार आणि विमा कंपन्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसाभरपाई अद्याप दिलेली नाही त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिल घनवट , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लालितदादा बहाळे महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनास राज्यव्यापी आंदोलन केले आहे तरी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या हक्काचा पीकविमा नुकसानभरपाई घेण्यासाठी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अ.नगर यांचे कडून करण्यात येत आहे.
या मोर्चासाठी 9 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजताचे अमरावती – पुणे या रेल्वे ने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी पुणे येथे जाणार आहेत तरी नगर जिल्ह्यातील सर्व 12 लाख विमाधारक शेतकऱ्यांना आवाहन आहे त्यांनी आपल्या हक्काचे 1162 कोटी रुपयांची पीकविमा नुकसानभरपाई ( गुंठ्याला 400 ते 500 रु मिळणार आहेत) घेण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे