आत्महत्या शेतकरी कुटुंबांना जिल्हासमिती मार्फत दिली जाणारी तातडीची 1 लाख रुपयांची मदत बंद करणाऱ्या महायुती साकार व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा जाहीर निषेध !! स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी अ.नगर
प्रतिनिधी — मुनीर सय्यद
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा संकल्प सोडला होता प्रत्यक्षात शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आले आहे गेल्या सहा महिन्यात विदर्भात 618, मराठवाड्यात 430 व उर्वरीत महाराष्ट्रासह 1300 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या राज्यात झाल्या आहेत आत्महत्या रोखणे तर दूरच उलट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनातर्फे जी तातडीची 1 लाख रुपयांची तातडीची मदत दिली जात होती त्याबाबतही शासनाने हात आखडता घेतला आहे.
याचा जाहीर निषेध स्वतंत्र भारत पक्ष,जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे व शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे यांच्याकडून करण्यात येत आहे
शेतकरी कुटुंबातून आलेल्या महसूलमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना जिल्हासमिती मार्फत दिली जाणारी 1 लाख रुपयांची तातडीची मदत पुन्हा सुरू करावी अन्यथा आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पाठीशी उभे राहण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी अ.नगर कडून त्रिव आंदोलन करण्यात येईल.