पीक विम्याचा थकीत रकमेसाठी स्वतंत्र भारत पक्षाचा कृषी आयुक्त कार्यालयावर ९ सप्टेंबरला मोर्चा
प्रतिनिधी — मुनीर सय्यद
नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकासणी पासून सुरक्षा कवच देणाऱ्या पिक विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे, स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. दिनांक ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र भरातून शेतकरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने झाली मात्र खोट्या आश्वासन पलीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही . महाराष्ट्रातील २१ लाख ४५ हजार ६६५ शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची थकीत रक्कम विमा कंपनी कडून येणे आहे. ही थकीत रक्कम २३०६ कोटी रुपये असून ती सरकार कडून कंपनीला देण्यात आली तरच ती शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते. गेली दीड वर्ष शेतकरी आशेने वाट पहात आहेत मात्र सरकार शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाही. सरकारी अधिकारी व कंपन्यांनी दिलेली आश्वासने व तारखा खोट्या ठरल्यामुळे पुन्हा शासनाचे लक्ष या महत्वाच्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी हा मोर्चा कडण्यात येणार आहे. सरकारने तातडीने पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास या मोर्चात पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येईल.
दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२. वाजता, पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतुळ्या पासून मोर्चाला सुरुवात होईल व अलंकार टॉकीज चौक, साधू वासवानी चौक मार्गे सेंटर बिल्डिंग येथील कृषी आयुक्त कार्यालयावर जाईल. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणे बाकी आहे त्यांनी मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, स्व.भा पक्ष प्रदेशाध्यक्ष, मधुसूदन हरणे, स्व.भा. पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, अर्जुन तात्या बोराडे, रुपेश शंके, लक्ष्मण रांजणे, निलेश शेडगे प्रकाश जाधव,बाळासाहेब घोगरे, मधू काकड, नवनाथ दिघे,रवी वानखेडे श्रीराम त्रिवेदी,नामदेव घोगरे, शांताराम महांकाळे , सुदामराव आसने,भाऊसाहेबअदिक. राजू शेख , पोपटभाई शेख,राजेंद्र आढाव, महिला आघाडीच्या सुनीताताई वानखेडे ,पुष्पा घोगरे ,कोमल वानखेडे,आशा माहांकाळे,मंदा गमे, वर्षा वानखेडे ,सुनीता चोरमल,शीतल पोकळे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.