थकीत पिकविम्याचे पैसे जमा न केल्यास आमदार खासदार पालकमंत्री यांना शेतकरी जाब विचारणार !!

प्रतिनिधी –मूनीर सय्यद

राज्यातील लाखो शेतकऱ्यांची मागील वर्षीचे खरीप व रब्बी हंगाम पिकांचे 2306 कोटी रुपयांची पीकविमा नुकसानभरपाई दीड वर्ष झालेत अजूनही विमा कंपन्यांनी दिलेली नाही कारण सरकारने विमा कंपन्याना शेतकरी वाट्याची प्रीमियम सबसिडी चे 2027 कोटी दीड वर्ष झालेत अजूनही दिली नाही त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई देण्यास नकार दिला आहे, कारण सरकारकडून प्रीमियम सबसिडी चे पैसे विमा कंपन्याचे घेणे असल्याने विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यास नकार देत आहेत, पीकविमा नुकसानभरपाई साठी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा, संघर्ष करत आहे आजवर अनेकदा निवेदन आंदोलने करूनही शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही फक्त तारीख पे तारीख देत आहेत भरपाई देण्यास जबाबदार असलेल्या सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी यांनी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना शेतकरी संघटना महिला आघाडीच्या नेतृत्वात 9 सप्टेंबर रोजी राज्याचे कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे धडक मोर्चा काढला त्यावेळी 10 दिवसात शेतकऱ्यांना भरपाई देन्याचे आश्वासन कृषी आयुक्तनी दिले 10 दिवसात खात्यावर पैसे जमा न केल्यास राज्यातील शेतकरी आता आपल्या आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार, पालकमंत्री यांना पीकविमा नुकसानभरपाई बाबत गावोगावी जाब विचारण्याचे आंदोलन करतील असा इशारा या वेळी देण्यात आला.
पीकविमा आंदोलनाची सुरुवात सर्वप्रथम नगर जिल्ह्यातील स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना महिला आघाडी ने करून राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांची पीकविमा नीनुकसानभरपाई ची समस्या चव्हाट्यावर मांडली त्याबद्दल पुढील आंदोलनाची दिशा देण्याचा मान नगर जिल्ह्यास देण्यात आला त्यावेळी आपल्या भाषणात पुढील आंदोलनाची दिशा सांगताना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे
या मोर्चाचे नेतृत्व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे यांनी केले .या मोर्चास नगर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीताताई वानखेडे , आशा महांकाळे, वर्षा वानखेडे,शीतल पोकळे,शीला वानखेडे , प्रकाश जाधव, बाळासाहेब घोगरे, श्रीराम त्रिवेदी, नामदेव घोगरे, शांताराम महांकाळे,बाळासाहेब घोगरे,मधू काकड , अशोक चोरमल, मयूर भनगडे,बाळासाहेब महांकाळे,अर्जुन दातीर, सुभाष घोगरे, संदीप घोगरे, नवनाथ दिघे,विष्णू भनगडे, संतोष जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!