गावकरी मंडळ आयोजित बैल सजावट स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
बेलापुर (प्रतिनिधी — देविदास देसाई )
-गावकरी मंडळ व बेलापुर-ऐनतपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पोळा सणानिमीत्त भरविण्यात आलेल्या बैल सजावट व मिरवणूक स्पर्धेत प्रथम क्रमांक भरत सोमाणी व अरुण जोशी यांच्या बैलजोडीने विभागून मिळवीला. यांत्रीक युगात बैल पोळा सणाचे महत्व कमी होत चालले असुन नविन पिढीला बैल पोळ्याचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा, जुन्या परंपरा पुन्हा उत्सहाने साजऱ्या व्हाव्यात या करीता गावकरी मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने व फर्टीलायझर असोसिएशनच्या सहकार्याने बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर पाऊस असुन देखील अनेक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक काकासाहेब बारहाते व हरिभाऊ वाकडे यांच्या बैल जोडीने तर तृतीय क्रमांक पोपट खोसे ,योगेश शिंदे, व अशोक वाबळे यांच्या बैल जोडीला विभागुन देण्यात आला. तर उत्तेजनार्थ भावेश कु-हे यांच्या बैलजोडीने मिळविला. बेलापुर येथील बाजारतळ येथे सर्व बैलजोडी एकत्र जमा झाली येथील हनुमान मंदिरात व बाजार वेशीत नारळ वाढवुन मिरवणूक प्रारंभ करण्यात आला. मिरवणूकीच्या अग्रस्थानी पंरपरागत सनई चौघडा वाद्य होते.गावातुन सवाद्य मिरवणूक सुरु असतानाच घरोघर या बैलजोडींची माता भगीनींनी पुजा केली.मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मिरवणूकीची सांगता झाली.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु.३३३३/- प्रवरा कृषी सेवा केंद्र, बेलापूर शांताराम शिंदे व पितळी तोडा श्री.जनार्दन ओहोळ,संचालक, गावकरी पतसंस्था यांचे कडुन,द्वितीय क्रमांक रु.२२२२/- माऊली कृषी भांडार,बेलापूर. अमोल भोंडवे व घुंगर माळ जनार्दन ओहोळ,संचालक, गावकरी पतसंस्था यांचे कडून
तृतीय क्रमांक रु. ११११/- विराट ऍग्रो सर्व्हिसेस,बेलापूर. यशवंत नाईक व घुंगर माळ जनार्दन ओहोळ,संचालक, गावकरी पतसंस्था यांचे कडून बक्षीसे ठेवण्यात आली होती.या स्पर्धेचे परिक्षण बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे व पत्रकार देविदास देसाई यांनी केले .यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच तबसुम बागवान,भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे,विष्णूपंत डावरे,दिलीप दायमा,जनार्दन ओहोळ,रत्नप्रकाश शिंदे, अमोल भोंडवे, अँड. यशवंत नाईक,रावसाहेब अमोलिक,प्रसाद खरात, सचिन वाघ,भाऊसाहेब तेलोरे,सोमनाथ जावरे, दिलीप अमोलिक,शफिक बागवान, भैय्या शेख,विशाल आंबेकर,मोहसीन सय्यद,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ, गणेश बंगाळ,प्रतिक मुथा,सुधीर तेलोरे,आदित्य जाधव,रोहित शिंदे,राधेश्याम आंबिलवादे,बाबासाहेब काळे,अशोक वहाडणे, नटवरलाल सोमाणी,महेश कुऱ्हे,गोपाल सोमाणी,अनिल औटी,ऋतुराज वाघ,सचिन मेहेत्रे,ओंकार औटी,सचिन पारखे,अजय शेलार,बाळासाहेब शेलार, हेमंत मुथा, नितीन खोसे,जब्बार सय्यद,तुषार खोसे, ओंकार साळुंके, स्वप्निल खैरे, भास्कर कोळसे,आसिफ शेख, राजेंद्र दांडगे,बबलू कामठे, गोपाल सोमाणी,माणिक नेहे,गणेश कारले, योगेश शिंदे,योगेश कोठारी,राजेंद्र गाडेकर, हरीश शेजुळ आदी उपस्थित होते.