आरोग्य उपकेंद्र बंद राहत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी टाळे ठोकले
वरीष्ठाकडे तक्रार करून सक्त समज देवून भोकरचे आरोग्य उपकेंद्र पुन्हा कार्यान्वीत

 

भोकर(प्रतिनिधी – चंद्रकांत झुरंगे) –

 

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून येथे उपकेंद्र कायम बंदच राहत असल्याच्या तक्रारींकरून ही कामकाजात सुधारणा होत नसल्याने व आठवडे बाजारचे दिवशी हि आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने अखेर संतप्त नागरीकांनी या उपकेंद्रास टाळे ठोकले, वरीष्ठांकडे तक्रार करून संबधीत कर्मचार्‍यांना सक्त समज देवून उपकेंद्र खुले करण्यात आले.
भोकर येथे तत्कालीन जिल्हा परीषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांचे सहकार्यातून येथे जिल्हा परीषदेच्या आरोग्य सेवेचे उपकेंद्र कार्यान्वीत झाले. त्यानंतर काही काळ चांगला कारभार चालला, त्यानंतर येथे सर्व सुविधा असताना आरोग्य सेवीका उपलब्ध नसल्याने एका ऊसतोडणी मजूर महिला या उपकेंद्राच्या बाहेर बाळंत झाल्याची घटना घडली त्यानंतर येथे तत्कालीन आरोग्य सेविका सुशिला बेल्हेकर यांनी कारभार हाती घेतला. त्यांचे काळात कारभार चांगला व लोकाभिमुख झाला. कोविड काळात ही या उपकेंद्राने ग्रामस्थांना चांगली साथ दिली.
परंतू आता गेल्या काही महिण्यापूसन येथे परीचारीका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व मदतनिस असे चार कर्मचारी असताना ही हे उपकेंद्र कायम बंदच राहत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी होत्या त्यावर नुकत्याच गेल्या महिण्यात झालेल्या महिला व सर्वसाधारण ग्रामसभेत संबधीतांना सुचना देवून उपकेंद्र पुर्णवेळ उघडे असावे, नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सुचना दिलेल्या असताना ही ऐन आठवडे बाजारच्या दिवशी हे उपकेंद्र बंद असल्याचे नवीन सदस्य मंडळाच्या व ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी करून ही योग्य उत्तरे मिळेना.
त्यातच येथील आरोग्य सेविकेस वरीष्ठांनी आठवड्याच्या दर शनीवार व सोमवार टाकळीभान येथील आरोग्य केंद्रात ड्यूटी लावल्याने त्या भोकर उपस्थीत होवू शकत नाही, उर्वरीत कर्मचारी बाहेरगावी गेलेले असल्याचे लक्षात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आहे त्या कुलूपावर दुसरे कुलूप लावून या उपकेंद्रास टाळे ठोकण्यात आले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री देशमुख व टाकळीभानचे आरोग्य अधिकारी डॉ. राम बोरूडे यांना कळविण्यात आले.
त्यानंतर काही कर्मचारी व आशा सेविकांसह ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थीत राहात खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपस्थीत सरपंच शितल पटारे व उपसरपंच सागर आहेर यांनी संबधीतांना अत्यावश्यक सेवेचे महत्व विषद करत चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणून संबधीतांना समज देवून मध्यस्थांच्या मार्गदर्शनाने कुलूप उघडून देण्यात आले. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार केली असल्याचे यावेळी सरपंच सौ. पटारे व उपसरपंच आहेर यांनी सांगीतले.
यावेळी उपसरपंच सागर आहेर, प्रताप पटारे, ग्रामपंचायत सदस्य काळू गायकवाड, वेणुनाथ डूकरे, निखील कांबळे, काळू डूकरे, राहुल अभंग, सुनिल वाकडे, रावसाहेब सुपेकर, दत्तू परदेशी, गोरख पंडीत, एकलव्य संघटनेचे राजू लोखंडे, गोविंद साळवे, गोरख आहेर, गोविंद न्हावले, माधवराव आबुज, राहुल मते, मिरा बारगळ, मंदा परदेशी व प्रियंका लोडवाल आदिंसह ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी ही संबधीतांना सक्त सुचना व समज दिली.

सोबत फोटो पाठवित आहे.
भोकर येथील आरोग्य उपकेंद्रास टाळे ठोकण्यात आले त्या प्रसंगी उपसरपंच सागर आहेर, प्रताप पटारे, काळू गायकवाड, वेणुनाथ डूकरे, निखील कांबळे, काळू डूकरे, राहुल अभंग, सुनिल वाकडे, रावसाहेब सुपेकर, दत्तू परदेशी, गोरख पंडीत, राजू लोखंडे, गोविंद साळवे, गोरख आहेर, गोविंद न्हावले, माधवराव आबुज, राहुल मते, मिरा बारगळ, मंदा परदेशी व प्रियंका लोडवाल आदि दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!