अहमदनगर जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
वाहनावरील प्रलंबित तडजोड शुल्क न भरल्यास लोकअदालतमध्ये हजर रहावे लागणार.

 

प्रतिनिधी:-इमरान शेख 
.
अहमदनगर राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार शनि पर दि. ०९/१२/२०२३ रोजी अहमदनगर
जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरात राष्ट्रीय लोकअदालतीचा प्रचार /
प्रसार सर्वसामान्य जनतेमध्ये होण्याकरीता लोकअदालतीचे प्रसिध्दी पत्रक वितरीत करण्यासाठी आजपासुन मा. प्रमुख जिल्हा
व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांचे मार्फत अॅटोरिक्षाद्वारे लोकअदालतीची
जाहिरात करण्यास सुरवात करण्यात आली. त्यावेळी श्रीमती भाग्यश्री पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,
अहमदनगर, श्री मोरेश्वर पेन्दाम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक शाखा, अहमदनगर वाहतुक विभागाचे पोलीस अधिकारी
व अंमलदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच पक्षकार यांचेकडुन हिरवा झेंडा दाखवुन अॅटोरिक्षा पाठविण्यात
आली. त्यावेळी अॅङ श्री अनिल सरोदे, मुख्य लोकअभिरक्षक कार्यालय, अहमदनगर व लोकअभिरक्षक कार्यालयाचे सर्व
विधीज्ञ अॅङ सुनिल मुंदडा, सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अॅङ श्री संदिप वांढेकर, श्रीमती शोभा गाडे, विधी
स्वयंसेवक व इतर विधीज्ञ तेसच पक्षकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
वाहतुक नियमांचा भंग करणारे व मोटार वाहन कायदयान्वये कारवाई केल्यानंतर प्रलंबित तडजोड शुल्काचा भरणा
न करणारे कसुरदार वाहनचालक यांचेविरुध्द मा. न्यायालयात खटले पाठविण्यात येणार असुन सदर सर्व वाहनचालक यांना
दि. ०९/१२/२०२३ रोजी होणारे लोकअदालत मध्ये हजर राहुन प्रलंबित तडजोड शुल्काचा भरणा करावा लागणार आहे..
त्यामुळे आपले मालकीचे / ताब्यातील वाहनावर दंड प्रलंबित असल्यास सदर दंड दि. ०९/१२/२०२३ रोजी होणारे
लोकअदालतीपुर्वी भरणा करावा व आपणाविरुध्द होणारे न्यायालयीन कारवाईपासुन मुक्त व्हावे. दंडाचे रक्कमेचा
लोकअदालतीपुर्वी भरणा केल्यास लोकअदालतीकरीता मा. न्यायालयात हजर राहण्याची गरज भारणार नाही असे अवाहन
पोलीस निरीक्षक श्री मोरेश्वर पेन्दाम यांनी सर्व वाहनचालक यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!