प्रतिनिधी:- अहमदनगर ब्युरो चीफ केशव आसने

माळवाडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी संविधान दिनानिमित्त रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी प्रथम लोक नियुक्त महिला सरपंच मीना मोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी 26-11 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सामूहिक संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी ग्रामविकास मंडळाचे डॉक्टर नितीन आसने, उपसरपंच शाम आसने ग्रामपंचायत सदस्य सुरेश आसने,दिलीप गायकवाड, योगिनी आसने, पुष्पलता आढाव, वैशाली साळवे, इंदुबाई खताळ यांच्यासह अनेक मान्यवर व माळवाडगाव ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
तसेच विठ्ठल आसने यांचे निवासस्थानी प्रथम लोक नियुक्त महिला सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि स्वाभिमानी ग्रामविकास मंडळाच्या सर्व कार्यकर्ते यांना चहापाण साठी घरी आमंत्रित केलेले होते.यावेळी सरपंच,उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य यांचा सत्कार विठ्ठल आसने यांनी केला. त्याचवेळी चहा आणि अल्पोहाराचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, तसेच बाळासाहेब हुरूळे,विश्वास वाघमारे, प्रमोद आसणे,श्रीकांत दळे,काका शेळके,विजय आसने, यशवंत हुरूळे,बाजीराव आसने भास्कर आसने, उत्तम आसने,छगनराव आसने बाळासाहेब आसने, पत्रकार भाऊसाहेब काळे, आबा शेळके,संजय आसने, नानासाहेब हरिश्चंद्र आसने यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!