किरण कणगरे, सतिश कणगरे व त्यांचे कुटुंबीय यांच्या अन्याय अत्याच्यारा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषणव आत्मदहन करणार..
( प्रतिनिधी -केशव आसने )
– वसंत नाना कणगरे,,
अविनाश नाना कणगरे,,
प्रभाकर नाना कणगरे आम्ही सर्व मु. पो. घोगरगाव ता. नेवासा जि. अ. नगर येथील कायमचे रहिवासी आहोत.
किरण कणगरे, सतिश कणगरे व त्यांचे कुटुंबीय हे माझे शेजारी असून ते माझे सखे भाऊबंद आहे. आम्ही चार भाऊ आहोत नामे क्र. १ अण्णासाहेबकणगरे (मयत) नामे क्र. २ प्रभाकर कणगरे, नामे क्र.३ वसंत फणगरे, नामे क्र.४ अविनाश कनगरे असे आम्ही चार भाऊ आहोत व आमच्या आपापसात असे ठरले होते की एकमेकांच्या वाटणीमधून एकमेकांसाठी प्रत्येकाने रस्ता खुला करून द्यावा त्याप्रमाणे आम्ही गट न. 255 च्या दक्षिण बाजूने रस्ता खुला करून दिलेला आहे परंतु किरण कानगरे हा आमच्या वटणीच्या मधोमद व घरासमोरून रस्ता बळजबरीने काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच माझ्या वाटणीमधून तिघांसाठी रस्ता खुला करून दिलेला आहे परंतु नामे क्र. १ अण्णासाहेब कणगरे हे मयत झाल्यामुळे त्यांच्या वाटणीचा कारभार शकुंतला कणगरे (पत्नी), किरण कणगरे (मुलगा) व त्यांचे कुटुंबियांच्या हातात असल्यामुळेते आम्हाला त्यांच्या वाटणीतील आमचा कायम स्वरूपी असलेला वाहिवाटीचा रस्ता आम्ही त्यांना मागितला असतं ते आमच्यावर खोट्या केसेस करतात जसे की, गुन्हे दखल करणे, दलित संघटनेला सोबत घेऊन आमच्या कुटुंबीय विरुद्ध बदनामीकारक उपोषाने करत आहे व आम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. तसेच गट नं. 314
मधील रस्ता मिळणेसाठी आम्ही कायदेशीर रित्या रस्ता केस क्र. 119/2023, 5(2) अंतर्गत मा. तहसीलदार साहेब नेवासा यांच्या न्यायालयात दाखल केलेली आहे. तसेच आम्ही आमच्या स्वतच्या (गट न. 255 साठी) बाहिवाटीच्या रस्त्यासाठी 5(2) अंतर्गत गट न. 253 व गट न. 254 मधून कायदेशीर रित्या रस्ता केस क्र. 120 /2023 मा. तहसीलदार साहेब नेवासा यांच्या न्यायालयात दाखल केलेली आहे. त्यामुळे किरण कणगरे व त्याचे कुटुंबीय हे आम्हाला आम्ही केलेली रस्ता केस मागे घ्यावी याकरिता प्रशासनाची दिशाभूल करून आमच्यावर दबाव आणून दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रशासनावर ही दबाव येऊन प्रशासन आमच्या केस ची दखल घेत नसल्याचे दिसत आहे तरी मा. साहेबांनी संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्ही व आमचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 20/02/2024 रोजी पासून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार आहे व न्याय लवकर न मिळाल्यास आत्मदहन करणार आहे तसेच आम्ही व आमच्या कुटुंबीयांनी आत्महतेचा प्रयत्र केला तर याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन व गृह विभागवार राहील याची नोंद घ्यावी व न्याय मिळवा ही नम्र विनंती.
मा. साहेब यांनी या निवेदनाची लवकरात लवकर दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे