संजय बहिरट व अनिल बहिरट यांचे जिल्हा आधिकारी यांना निवेदन..

न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकार्यालय समोर २२/२/२०२४ रोजी अमरण उपोषण करणार

संजय साहेबराव बहिरट
अनिल साहेबराव बहिरट रा. घोगरगाव
माझ्या खाजगी मालकीच्या गट न. 259 मधील रस्त्यावर अतिक्रमण करण्यासाठी किरण कणगरे, सतिश कणगरे व त्यांचे कुटुंबीय आणि दलित महासंघ बहुजन समता पार्टी या संघटनेला सोबत घेऊन आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण व आत्मदहन करणार

आम्ही सर्व मु. पो. घोगरगाव ता. नेवासा जि. अ. नगर येथील कायमचे रहिवासी आहोत.
गट न. 259 मध्ये आमच्या मालकीची जमीन आहे व त्या गटामधूनच मी आमच्या स्वतच्या वापरासाठी पूर्व बाजूकडून दक्षिणोत्तर असा माझ्या घरपर्यंत रस्ता सोडलेला आहे व त्या रस्त्यावरून आम्ही व आमचे कुटुंबीय रहदारी करतो. तसेच माझ्या शेजारी राहणारा किरण अण्णासाहेब कणगरे हा दलित संघटनेला (दलित महासंघ बहुजन समता पार्टी) सोबत घेऊन शासनाची दिशाभूल करून जातीवाद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्यावर खोट्या नाढ्या केसेस उदा. अॅट्रोसिटी सारख्या गंभीर केसेस करून दोन जातीमद्धे गंभीर स्वरूपाचे मतभेद निर्माण करत आहे.

तसेच गट न. 255 मधील केस क्र. 71/2017 या निकालात किरण कणगरे व संघटणेकडे माझ्या खाजगी रस्त्यावर अतिक्रमण करण्यासाठी कुठलाही ठोस किवा कायदेशीर निकाल, आदेश नाही किंवा माझ्या खाजगी गट न. 259 चा कुठलाही उल्लेख नसताना देखील संबंधित संघटनेचे श्री. वसंतराव संकट हे संघटनेच्या पदाचा गैरवापर करून आमच्यावर अन्याय व अत्याचार करत आहेत आणि आमच्याविरुद्ध बदनामीकारक ( सोशल मीडियावर पोस्ट करणे, वृत्तपत्राला बातमी देणे) यासारखे कृत्य करत आहे व त्यामुळे आमच्या कुटुंबाची
बदनामी होत आहे. तसेच केस क्र. 71/2017 या केस च्या निकाला मध्ये गट न. 254 मधून रस्ता खुला करण्याचा आदेश असताना देखील प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे आणि दलित संघटनेच्या दबाव खाली येऊन आम्हाला नहाग मानसिक त्रास देत आहे. त्याकरिता किरण कणगरे व त्याचे कुटुंबीय आणि श्री. वसंतराव संकट (उपाध्यक्ष- दलित महासंघ बहुजन समता पार्टी) यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी या करीता आम्ही व आमचे कुटुंबीय दि. 22/02/2024 रोजी पासून मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करीत आहे व लवकर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार आहे. याची दखल घ्यावी व न्याय मिळवा ही नम्र विनंती.
मा. साहेब यांनी या निवेदनाची लवकरात लवकर दखल घ्यावी.असे निवेदन
1) मा. गृहमंत्रालाय महाराष्ट्र राज्य
2) मा. समाज कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य
3) मा. अध्यक्ष मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य
4) मा. जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब, अहमदनगर
5) मा. जिल्हा पोलिस उपअधीक्षक कार्यालय, शेवगाव
6) मा. पोलिस निरिक्षक, नेवासा
7) मा. तहसीलदार साहेब, नेवासा यांना दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!