भोकर शिवारात विहीरीत पडलेल्या बछड्याला जीवदान
वनविभाग व शेतकर्‍यांच्या मदतीने बछड्यास निसर्गात मुक्त करण्यात आले

(भोकर प्रतिनिधी-चंद्रकांत झूरंगे) –

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील बारा खोंगळ्या तळ्यालगत शेती असलेले भोकर सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे यांच्या विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या मदतीने त्या बछड्याला विहीरीच्या बाहेर काढून त्यास निसर्गाच्या स्वाधीन करून मुक्त करण्यात आले. या बछड्याला जीवदान मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. हा बछडा लहान असल्याने त्यास त्याच्या मातेची गरज असल्याचे वनविभागाने सांगीतले.
भोकर व खोकर परीसरात तसा अनेक वर्षापासून बिबट्याचा व बिबट्याच्या मादीचा मुक्त वावर आहे. अनेकदा अनेक शेतकर्‍यांना यांचे दर्शन तसे नित्याचेच झालेले असल्याने तसा त्यांचा मुक्त संचार ही नित्याचाच आहे. परीस्थीती नुसार परीसरातील शेतकरी ही खबरदारी घेत आपले शेती कसत आहे. जीव मुठीत धरून आपली उपजीविका करत आहे.
अशा परीस्थीतीत काल बुधवार दि.12 फेब्रुवारीच्या मध्यरात्री उशीराने कधी तरी भोकर शिवारातील बारा खोंगळ्या नामक तलावालगत गट नं.116 मधील सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे यांच्या विहीरीत बिबट्याचे बछडे पडले हा प्रकार काल मंगळवार दि. 13 फेब्रुवारीच्या सकाळी लक्षात येताच सागर शिंदे यांनी लागलीच वनविभागाशी संपर्क केला. रात्रभर हा बछडा या विहीरीच्या आतील कठड्यावर बसलेला होता. कोपरगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे वनरक्षक अक्षय बडे व मदतनिस गोरक्षनाथ सुरासे हे विहीरीजवळ दाखल होत लगतच्या शेतकर्‍यांच्या मदतीने दोरखंड व कॅरेटच्या मदतीने या बछड्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले.
हा बछडा सहा ते सात महिने वयाचा असल्याने त्यास मातेची गरज आहे शिवाय जवळच या बछड्याची माता असण्याची शक्यता लक्षात घेवून वन विभागाने शासनाच्या नियमांचे पालन करत या बिबट्याच्या बछड्याला उपस्थीतांसमोर लगतच्या ऊसात सोडून देत त्यास निसर्गात मुक्त करण्यात आले. या बछड्याला वनविभागाने जीवदान दिल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!