इंदिरानगर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान – ह भ प कृष्णानंद महाराज
वडाळा महादेव [ वार्ताहर – राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील इंदिरानगर परिसरातील श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले असल्याचे प्रतिपादन ह भ प कृष्णानंद महाराज यांनी केले
शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
ह भ प कृष्णानंद महाराज यांनी आदिमाया आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवी महिमा आदि कीर्तनामधून व्यतीत केले तसेच अनाथ निराधार गरजू व्यक्तींची सेवा करण्याचे भाग्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मिळाले असल्याबद्दल माहिती दिली तसेच भाविक भक्त यांना मदतीचे आवाहन केले श्री तुळजाभवानी मंदिर येथे
दैनंदिन नित्य आरती . उपासना श्री दुर्गा सप्तशती पाठ प्रसाद तसेच विविध कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडतात श्री तुळजाभवानी देवी आराध्य दैवत असल्याने श्रीरामपूर तसेच पंचक्रोशी तालुक्यातून भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी असते अगदी कमी कालावधीमध्ये नावारूपास आलेले मंदिर असुन भाविक भक्तांच्या सहकार्याने परिसर सुशोभीकरण सभा मंडप असे अनेक कार्य दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून सुरू आहे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमा उत्सव महाआरती महाप्रसादाचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते नवसाला पावणारी देवी असल्याने परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे सायंकाळी माता भगिनी महिला नवरात्री उत्सव निमित्त दांडिया फेर भोंडला देवीचे गीत गायन करत असतात यासाठी महिलांचा मोठा उस्फुर्त प्रतिसाद असल्याचे दिसुन येते या कार्यक्रमासाठी इंदिरानगर परिसरातील सर्व भाविक भक्त प्रयत्नशील आहे