भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे आजवरच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळणार सगळ्यात मोठी पीकविमा नुकसानभरपाई
( प्रतिनिधी- मुनीर सय्यद )
2023 सालचा थकीत पीकविमा नुकसानभरपाई मिळविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने गेल्या 5 महिनेपासून अखंड पाठपुरावा संघर्ष करून बलाढ्य सरकारच्या व विमा कंपनीच्या नरड्यात हात घालून शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा नुकसानभरपाईचा घास शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे !!!!
अहिल्यानगर जिल्ह्यासह 6 जिल्ह्यातील 50 लाख विमाधारक शेतकऱ्यांना 1927.52 कोटींची पीकविमा नुकसानभरपाई मिळणार आहे यात नगर 713 कोटी,नाशिक 656 कोटी जळगाव 470 कोटी , सातारा 27.73 कोटी , सोलापूर 2.66 कोटी , चंद्रपूर 58.90 कोटी रुपयांची हक्काचा पीकविमा नुकसानभरपाई मिळणार आहे सदर आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अनिल घनवट,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री ललितदादा बहाळे,महिला आघाडीच्या अध्यक्षा मा.सू श्री. सीमाताई नरोडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याकामी आपल्याला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची अनमोल मदत झाली, कृषी आणि महसूल अधिकारी , कर्मचारी यांनी आपला अधिकार कौशल्य पणाला लावून लाखो शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा नुकसानभरपाई मिळण्यात मदत केली.त्याबद्दल जिल्हा कृषी अधीक्षक मा. श्री. सुधाकर बोराळे साहेब , मा. श्री किरण मोरे साहेब कृषी उपसंचालक , मा . श्री दत्तात्रय जाधव साहेब तंत्र अधिकारी अहील्यानगर.पीकविमा लवादाचे अध्यक्ष मा.श्री राजेन्द्र पाटील साहेब निवासी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचा सत्कार स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगर कडून करण्यात आला याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाअध्यक्ष नीलेश शेडगे ,शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुनीताताई वानखेडे, आशाबाई महांकाळे, वर्षाताई वानखेडे,पुष्पा घोगरे ,शीतल पोकळे कोमल वानखेडे,सुनंदा चोरमल, रुक्साना शेख ,कावेरी घोगरे,शिलाबाई वानखेडे, बाळासाहेब घोगरे,श्रीराम त्रिवेदी,मधुकर काकड,नवनाथ दिघे,नामदेव घोगरे,अर्जुन दातिर,प्रकाश जाधव, शांताराम महांकाळे,विष्णू भनगडे, नारायण कदम ,अशोक चोरमल ,अंबादास गमे,रवी वानखेडे,मयूर भनगडे,संतोष जाधव,भानुदास चोरमल,सुभाष घोगरे , सुभाष आव्हाड,आदीसह जिल्ह्यातील विमाधारक शेतकरी उपस्थित होते .