नशा मुक्तीसाठी 71 वर्षाचा तरुण करतोय चार हजार किलोमीटर ची सायकल यात्रा
प्रतिनिधि -केशव आसने
देशाची एकता, नशामुक्ती, रक्तदान, आयुर्वेद प्रचार
श्रीनगर ते कन्याकुमारी हा जवळ जवळ 3800 ते 4000कि. मि. प्रवास करून देशाची एकता, नशामुक्ती, रक्तदान, पर्यावरण समतोल तसेच आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने रघुवीरजी खोड हा 71 वर्षीय तरुण अवलिया सायकल स्वार निघालाय. आपल्या या प्रवासाने जनजागृती करण्यासाठी 5 ऑक्टोबर पासून ते सायकल ने प्रवास करत निघाले आहेत. दिनांक 16/10/2024 रोजी त्यांचे महाराष्ट्रात आगमन झाले.काल ते मालेगाव च्या मागे धुळ्याच्या पुढे मुक्कामी होते. तेथून पुढील प्रवासात आपल्या अहमदनगर च्या टीमच्या साईसेवा रक्तदान ग्रुप आणि मुठेवाडगाव रक्तदान परिवार यांनी त्यांचे या मार्गांवर येणाऱ्या प्रत्येक शहरांत त्यांचे हार शाल श्रीफळ देऊन व इतरही मदत करत स्वागत करण्यात आले यात कोपरगाव, शिर्डी, राहता येथे प्रचंड उत्साहत स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच राहुरी फॅक्टरी येथे साईसेवा &मुठेवाडगाव रक्तदान परिवाराचे श्री. अभयकुमार तेलतुंबडे, श्री. सतपालसिंग गुड्डू, प्रहार जनशक्ती चे श्री. अप्पासाहेब ढूस, श्री. सुनिलभाऊ गुलदगड, डॉ. मकासरे,श्री.बाळासाहेब मुसमाडे,बाळासाहेब कुऱ्हाडे, भारत मुसमाडे,चंद्रकांत कराळे, भारत खांदे,dr. मुसमाडे तसेच शिव आरोग्य सेना श्रीरामपूर व साईसेवा &रक्तदान परिवाराचे असंख्य कार्यकर्ते यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व ते सायंकाळी नगर मुक्कामी रवाना झाले. आज सकाळी नगर मधेही त्यांचे खूप जल्लोषात स्वागत करण्यात आले व तेथून ते सोलापूर कडे रवाना झाले. आज ते सोलापूर जवळ कुरुडवाडी येथे मुक्कामी आहेत. याकामी श्री. अभय तेलतुंबडे, सतपालसिंग गुड्डू, अमोल भाऊ कटके तसेच हर्ष फौंडेशन चे श्री. अप्पासाहेब घोरपडे व साईसेवा आणि मुठेवाडगाव रक्तदान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.रोज ते या वयात 200 ते 250 कि. मि. प्रवास करतात.या अवलिया च्या या कार्यास सलाम आहे.