भीम पँथर सामाजिक संघटनेच्या औरंगाबाद महिला जिल्हा अध्यक्ष पदी ज्योती आनंद खरात यांची नियुक्ती करण्यात आली
श्रीरामपूर प्रतिनिधी —
वाळूज एमआयडीसी तालुका गंगापूर चे ज्योती आनंद खरात यांची भीम पँथर सामाजिक संघटने मध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव गांगुर्डे साहेब यांच्या मार्गद्शन व नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश महासचिव राज खान साहेब , अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मोहम्मद भाई शेख , नानासाहेब शिंदे, मुराद पठाण, यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली त्या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री.राज खान यांनी ज्योती खरात यांना म्हणाले की भिम पॅंथर सामाजिक संघठना महाराष्ट्र राज्य ही एक सामाजिक संघटना असुन तिचे ध्येय, कार्य हे समाजाच्या उन्नतीचे आहे. महामानवांचे क्रांतीवीरांचे विचार व कार्यआणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात पिछाडलेल्या समाजाला उन्नत करणे. त्यांच्या ठायी असणारे विकार अज्ञान,अंधविश्वास, व्यसनधीनता, दारिद्रये यांचे निर्मूलन करणे, त्यांच्यावर होत असलेले अन्याय अत्याचांराना आळा घालुनन्याय मिळतुन देणे, अधार विचाराने विखुरलेल्या समाजाला संघटीत करणे या संघटनेच्या ध्येय व कार्यासाठी आपणएक क्रियाशील सुशिक्षीत कर्तुत्ववान चंचल चाणाक्ष होतकरू कार्यकर्ता असुन आपण सामाजिक कार्यामध्येमहामानंवाच्या आणि क्रांतीविरांच्या विचारास अनुसरुन आदिवासी समाजासह, इतर बहुजन, अल्पसंख्याक, भठक्याविमुक्त जाती जमाती समाजाला न्याय देणेकामी कार्य करण्याची जिद्ञ, चिकाठी, सचोटी , अभ्यासुवृत्ती समजाप्रतीअसलेली तळमळ पाहन आपण या कार्यास पात्र आहात. समाजाच्या कार्यास गती दयाल अशी अपेक्षा आहे. समाजाच्यासर्वागीण विकासबाबत सक्रिय सहभाग घेतुन तन- मन धनाने समाजाची निष्कलंक सेवा करावी.
यावेळी कपिल पठार , सुमित खरात , रावसाहेब बागुल, इंदुबाई प्रधान , सुनीता बागुल , संगीता शिरसाठ , मनिषा कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.