राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत दळे तर राष्ट्रवादी युवक च्या श्रीरामपूर तालुका सरचिटणीस पदी आनिकेत आसने यांची निवड.

श्रीरामपूर प्रतिनिधी –इमरान शेख

श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती चा सोहळा पार पडला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,राष्ट्रवादी युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज भैय्या चव्हाण यांच्या मान्यतेने अविनाशजी अदिक राष्ट्रीय प्रवक्ते तथा सरचिटणीस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष कृष्णा जयराम आढाव यांच्या हस्ते

राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी माळवाडगाव चे श्रीकांत दळे, यांची नियुक्ती करण्यात आली तसेच राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप चोरगे यांच्या मान्यतेने श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सयचिटणीस पदी आनिकेत आसने यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व माळवाडगावचे उपसरपंच शामराव आसने , सोमनाथ मोरे ,राजेंद्र आसने काकासाहेब शेळके, कुंडलीक लटमाळे अनीकेत आसने, प्रशांत दळे ,तान्हाजी खताळ ,भारत दळे,सह माळवाडगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!