मुठेवाडगाव येथील न्यू इंग्लिश शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा चिमुकलीला आधार..
श्रीरामपूर प्रतिनिधी –इमरान शेख
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त अध्यात्मबरोबर सामाजिक उपक्रम राबवून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक आदर्श निर्माण केला.
कोरोना महामारी काळात सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे इंजिनियर श्री निलेश आसने यांनी सर्व माजी विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात रहावेत जुन्या आठवणींना उजाळा भेटावा म्हणून सोशल मीडियावर व्हाट्स आप वर शाळेचा ग्रुप तयार केला त्यात गावातील व बाहेरगावी कामानिमित्त असणारे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली जोडल्या गेल्या.
सालाबादप्रमाणे येणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव येथे संत तुळशीराम महाराज अखंड हरिनाम सप्ताहात न्यू इंग्लिश शाळेचे माजी विद्यार्थी बाहेरगावी नोकरी निमित्ताने स्थायिक तसेच सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सुट्टीत जरी आल्या नाही तरी हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात हजेरी लावताततच.
यावर्षीच्या 55व्या अखंड हरिनाम सप्ताहात सण 2005 च्या दहावीच्या बॅच चे माजी विद्यार्थी जमले विचारांची देवाणघेवाण कुणाचे काय चालले अश्या गप्पा रंगल्या त्यातील प्रगतीशील शेतकरी श्री बबनराव मुठे यांनी वर्गातील अर्चना मुठे हिचे पतीचे देहांत झाल्याने आपण तिच्या चिमुकल्या मुलींच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी काही करू शकतो का असा विचार मांडला त्याक्षणी सामाजिक क्षेत्रात नगर येथे कार्यरत असणारे श्री प्रवीण दोंड यांनी या विचारास अनुमोदन देऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी भरीव अशी मदत ग्रुप चे अध्यक्ष श्री.बबनराव मुठे व उपअध्यक्ष श्री.गणेश नेहे यांच्याकडे गोळा केली. यावेळी हडपसर येथे पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या सुवर्णा गोसावी पुणे येथील सुनील गोसावी तसेच प्रगतशील शेतकरी श्री.गोविंद मुठे,दिलीप मुठे,शंकर मुठे,विठलंपंत मुठे,नारायण दिघे,श्रीराम मुठे,गणेश मुठे,नितीन मुठे,अरुण मुठे,महेश मुठे, शिक्षक जगदीश पवार,प्रकाश मुठे,गणेश कडूस,संदीप पाचपिंड,मनोहर आठवले,सविता गायकवाड, स्वप्नाली पाचपिंड, अनिता मुठे,भाग्यश्री जासूद,मारुती रूपटक्के,मेहमूद शेख,प्रकाश जाधव,रामेश्वर मुठे,राहुल रूपटक्के,संतोष मुठे,पल्लवी मुसमाडे,अमोल मुठे,सोमनाथ गायकवाड यांनी भरीव मदत केली व एक आदर्श निर्माण केला.