माऊली वृद्धाश्रमात गोशाळेचे उद्घाटन – गोमातेचे रक्षण काळाची गरज – अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग श्री शेखर मुंदडा
श्रीरामपूर [ प्रतिनिधी–राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर येथील नेवासा रोड वरील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ असलेले माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी नूतन माऊली गोशाळा प्रारंभ करण्यात आला प्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा यांचे शुभहस्ते गोग्रास देऊन गोपूजन तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन आश्रमातील आजी आजोबा यांच्याशी हितगुज करतात अनाथ आबाल विद्यार्थी यांच्याशी चर्चा विनिमय केले तसेच उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना आयोग अध्यक्ष माननीय श्री शेखर मुंदडा यांनी गोसेवा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले व गोसंवर्धनाच्या बाबतीत कोणालाही काहीही अडचण असल्यास तात्काळ संपर्क करावा असे आवाहन केले आहे प्रसंगी उद्योजक अभिजीत कुदळे श्री मुकुंद शिंदे श्री दर्शन मुंदडा माऊली वृद्धाश्रम अध्यक्ष सुभाष वाघुंडे सौ कल्पना वाघुंडे सौ वंदना विसपुते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंखे पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार राजेंद्र देसाई दत्तात्रेय खिलारी बाळासाहेब देशपांडे लक्ष्मीकांत जेजुरकर संतोष भालेराव शुभम नामेकर आरक काका सौ लता साळुंखे तसेच मोठ्या संख्येने गो सैनिक भाविक भक्त उपस्थित होते आश्रमाच्या वतीने गोसेवा आयोग श्री शेखर मुंदडा यांचा सन्मान करण्यात आला आभार अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी मानले