मीनाक्षी देसाई यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान

 

श्रीरामपूर [ प्रतिनिधी– राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सौ मीनाक्षी राजेंद्र देसाई यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला
श्री क्षेत्र सरला बेट गोदाधाम मठाधिपती रामगिरीजी महाराज तसेच आदर्श गाव हिवरे बाजार पद्मश्री सरपंच पोपटराव पवार डॉ विश्वासराव आरोटे यांचे शुभ हस्ते सौ देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी येवला पैठणी साडी . घड्याळ . चांदीचे महालक्ष्मी प्रतिमा डायरी कॅलेंडर याचा यामध्ये समावेश आहे प्रसंगी शिवव्याख्याते प्रदीपजी कदम श्रीक्षेत्र सरला बेट गोदाधाम विश्वस्त मधुकर महाराज कडलग शिर्डी येथील कोते पाटील नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव जिल्हा अध्यक्ष राहाणे साहेब ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे सौ गोंदकर ताई पत्रकार चंद्रकात झुरंगे राजेन्द्र देसाई आदी प्रमुख उपस्थित होते महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी उपस्थित पुरस्कारार्थी यांना शुभ आशीर्वाद देऊन भविष्य कालावधीमध्ये उत्तम प्रकारे देशसेवा गोसेवा तसेच आई-वडिलांची सेवा करावी असा संदेश दिला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते आभार राहणे साहेब यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!