सुहास राठोड यांची वंचित आघाडी मध्ये प्रवेश
श्रीरामपूर [ प्रतिनिधी–राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सुहास राठोड यांनी वंचित बहुजन आघाडी यामध्ये शेकडो कार्यकर्त्याच्या समवेत प्रवेश केला आहे श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसनराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री सुहास राठोड यांनी वंचित बहुजन आघाडी यामध्ये पदार्पण केले तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी प्रयत्नशील असुन मान्यवरांच्या हस्ते राठोड यांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी श्री राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडी सर्व समाजाला न्याय देण्याचे काम करणार असून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली विद्यार्थी . खाजगीकरण .महिला अत्याचार .अन्याय आदी विषयावर अध्ययन करून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून समाजाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी राज्यभरातून वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वानुमते राठोड यांचा सन्मान करण्यात आला