श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात महिला दिन साजरा..
वडाळा महादेव [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करण्यात आला. सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा पुष्पगुच्छ व स्नेह वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘अवघड वाटणाऱ्या क्षेत्रातही स्त्रीने आघाडी घेतली आहे’, असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मान.श्री.माळी डी.एन.सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील जेष्ठशिक्षिका सौ. शितल निंभोरे मॅडम यांनी कवितेच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. बी.एड.छात्र अध्यापक श्री. पिंपळे सर व श्री. थिगळे सर यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांचे महत्त्व व योगदान विद्यार्थ्यांना पटवून दिले.यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.संतोष नेहूल ,श्रीम.स्वेजल रसाळ ,श्रीम.प्रज्ञा कसार , श्री.भास्कर सदगीर, सौ.दिपाली बच्छाव ,श्री.अविनाश लाटे, श्रीम.सुनिता बोरावके,श्रीम.जिजाबाई थोरात, सौ.जयश्री जगताप, श्री.प्रशांत बांडे,श्री.अशोक पवार, श्री.संदीप जाधव ,श्री.भास्कर शिंगटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. छात्र अध्यापक श्री.राऊत सर यांनी केले. तर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.बाळासाहेब कसार यांनी आभार मानले.