माऊली वृद्धाश्रमातील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
-संतांच्या संगती मध्ये मनुष्य जन्माचा उद्धार – ह भ प शुभम महाराज कांडेकर
वडाळा महादेव [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील नेवासा रोड वरील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची डॉ आचार्य शुभम महाराज कांडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता समारोह झाला प्रसंगी ह भ प कांडेकर महाराज यांनी संतांच्या संगती मध्ये मनुष्य जन्माचा उद्धार होत असल्याचे प्रतिपादन करत उपस्थित भाविकांना काल्याचे कीर्तनाचे महत्त्व कृष्ण बाल हट्ट कृष्ण लीला तसेच माऊली वृद्धाश्रमातील निराधार आजी आजोबा यांच्या विषयी माहिती विशद करत उत्सवातील सांगता काल्याच्या कीर्तनाने प्रसादाने करतात अशी वारकरी संप्रदायाच्या परंपरेने सुरू असल्याबद्दल उपस्थित भाविक यांना सांगितले तसेच या सप्ताह कालावधीत सर्वांचे महत्त्वाचे योगदान असून सर्वच भाविक भक्त एकत्र आल्यानंतरच सप्ताह साजरा होतो यावेळी संत पूजन येथील अक्षय अरुण देसाई यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी ह भ प शरद नाना राजवळ ह भ प दत्ता काका जोशी मोनिकाताई भोसले रुद्र भोसले गायनाचार्य शिवदास बाबा दाभाडे मच्छिंद्र खपके सुधाकर लोंढे विजय शिंदे हांडे महाराज गोरक्षनाथ अकोलकर अजिंक्य पवार सोहम राऊत बापू गायधने गड्डे गुरुजी
मैड महाराज परदेशी महाराज त्रिभुवन महाराज झरेकर अण्णा गवारे महाराज नवनाथ सलालकर एकनाथ राऊत आप्पा माकोणे आकाश मैड दत्तात्रेय जायभाय पोपटराव उंडे श्री सुखदेव सुकळे भिमराज बागुल दीपक देशपांडे भागवतराव मुठे कचरू निकम राजेंद्र बोरावके सौ वंदना विसपुते अरुण विसपुते लताताई यादव बाबासाहेब यादव कैलास शेठ खंदारे भारती वाघुंडे लिलाताई माळी दत्तात्रेय खिलारी शुभम नामेकर दिनेश जेजुरकर श्री देशपांडे काळे गुरुजी व्यवहारे गुरुजी सप्ताहाचे संयोजन राहुल राऊत अध्यक्ष सुभाष वाघुडे सचिव कल्पना वाघुडे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ बाबुराव उपाध्ये पत्रकार राजेन्द्र देसाई यांनी केले परिसरातील सर्व भजनी मंडळाच्या वतीने काकडा हरिपाठ सेवा देण्यात आली तर उंबरगाव येथील मोनिकाताई भोसले परिवाराच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आभार सौ कल्पना वाघुडे यांनी मानले