एनजीओ सेलच्या संयोजकपदी सुभाष वाघुंडे
वडाळा महादेव [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई]
भाजपाच्या अहमदनगर शहर लोकसभेसाठी एनजीओ संयोजकपदी महा एनजीओ फेडरेशन समन्वयक सुभाष वाघुंडे यांची निवड करण्यात आली . भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मान्यतेने व महा एनजीओ संस्थापक व गो – सेवा आयोगाचे अध्यक्ष तथा एनजीओ संपर्क प्रमुख शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुभाष वाघुंडे यांची निवड करण्यात आली अहमदनगर शहर लोकसभा व विधानसभा विभागातील अनेक एनजीओचे प्रश्न सोडवण्यास महत्वाची जबाबदारी वरीष्ठ नेतृत्वाने सोपवली आहे या संधीचे नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रश्न सोडवण्यास मदत होईल भाजपाचे विचार तसेच मा उपमुखमंत्री देवेन्द्रजी फडणवीस मा चंद्रशेखर बावनकुळे मा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील श्री शेखर भाऊ मुंदडा यांनी सोपवलेली जबाबदारी पुढे नेण्यास मि नेहमी कटिबद्ध असल्याचे श्री वाघुंडे यांनी सांगितले