माऊली वृद्धाश्रमातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ
वडाळा महादेव ( प्रतिनिधी–राजेंद्र )
तालुक्यातील शिरसगाव भागातील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माऊली वृद्धाश्रमातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळीच मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे.
शुक्रवार २२ ते२९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वाचनास प्रारंभ करताना प्रारंभी श्रीसंत ज्ञानेश्वर प्रतिमा व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूजन करण्यात आले. प्रारंभी डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना संतसाहित्य, संतांचे महत्व,श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामर्थ्य आणि माऊली वृद्धाश्रमाचे कार्य याविषयी विवेचन केले. माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे,सौ. कल्पनाताई वाघुंडे यांच्या नियोजनाखाली श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ वाचण्यास प्रारंभ झाला. व्यासपीठ संचालक ह.भ.प. शरद राजवळ नाना यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी प्रतिमा पूजन झाले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन केले. कल्पनाताई वाघुंडे व जयश्री भावसार यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन केले. शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेने, आचार्य डॉ.ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर यांच्या अधिपत्याखाली सुरु झालेला हा धर्मसोहळा सर्वांच्या योगदानातून दरवर्षी यशस्वी होतो असे सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी सांगितले. कचरू निकम, ताराताई निकम, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील मृणाल देसाई,
शैला जवळकर, दीपक जवळकर, प्राचार्य के. एस. काळे, दीपक देशपांडे, लक्ष्मीकांत कुळकर्णी,शारदा कुलकर्णी, मालन आघाव, सविता वाघ, गयाबाई भावसार, स्वप्नाली तायडे, जयश्री भावसार, शोभा पवार, मंदा गायके, शकुंतला तुपे, वंदना विसपुते, एकनाथ खपके, विजया गर्जे, शालिनी निघुते शकुंतला कोठावळे राम डोळस, कुसुम साळुंखे, भाऊसाहेब राऊत, सुमन वाघचौरे
आदिंनी उदघाटन पूजनात व वाचनात भाग घेतला. पत्रकार राजेंद्र देसाई, डॉ. भाऊसाहेब कवाडे, दत्तात्रय खिलारी, राहुल राऊत शुभम नामेकर, दिनेश जेजुरकर यांनी नियोजन केले. यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते