अतिक्रमण काढल्यानंतर चुकीचा संदेश पसरवुन तोडफोड करुन पुन्हा अतिक्रमण पोलीस व ग्रामस्थामुळे वादावर पडदा..
बेलापुर (प्रतिनिधी–देविदास देसाई )
-बेलापुर ग्रामपंचायतीच्या जागेत केलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढल्यानंतर चुकीचा संदेश पसरविण्यात आल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी बांधलेले कंपाऊड तोडून पुन्हा तेथे जनावरे बांधल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करुन वादावर पडदा पाडला या बाबत हकीकत अशी की,बेलापुर बाजार तळाजवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अतिक्रमण करुन जनावरे बांधण्यात आली होती. तेथे शेड बांधण्यात येणार असल्याचे समजताच बेलापुर ग्रामपंचायतीने ते सर्व सामान कार्यालयात आणले त्यानंतर ग्रामपंचायत पदाधीकारी सदस्य व ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण काढुन टाकले व बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने त्या जागेस तार कंपाऊड करण्यात आले .ही बाब काहींना खटकली त्यांनी अपप्रचार करुन गो शाळेतुन गायी बाहेर काढल्या असा संदेश पसरविला त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले .चुकीच्या माहीतीमुळे आलेल्या कार्यकर्त्यांनी बेलापुर ग्रामपंचायतीने केलेल्या कंपाउडची तोडफोड केली तसेच त्या जागेत पुन्हा जबरदस्तीने जनावरे बांधली ,ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला ,पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले ,त्यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणले जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे देविदास देसाई आदिसह सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा झाले .या वेळी संबधीत अतिक्रमण करणारांनी चुकीचा संदेश दिला की गो शाळेत बांधलेल्या गायी सोडून दिल्या त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते बेलापुर पोलीस स्टेशनला जमा झाले तेथे ग्रामस्थ पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये बराच वेळ जोरदार बाचाबाची झाली या वेळी जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा यांनी स्पष्टपणे सांगीतले की ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करुन चुकीचा संदेश पसरवुन गावातील वातावरण कुणी खराब करत असेल तर ते कदापीही खपवुन घेणार नाही, त्यामुळे कंपाउडची तोडफोड करणारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली त्याच वेळी श्रीरामपुरहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली की अतिक्रमण काढु नये या करीता गो शाळेतुन गायी काढुन दिल्याचा चुकीचा संदेश देवुन बोलविण्यात आले त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यानीही थोडेसे नमते घेतले, अखेर ताबडतोब पुन्हा ग्रामपंचायतीची जागा मोकळी करुन द्यावी नाहीतर शासाकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम भूमीका सुनिल मुथा सरपंच स्वाती अमोलीक जी प सदस्य शरद नवले अभिषेक खंडागळे प्रफुल्ल डावरे यांनी घेतली अखेर पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यावर आपापसात एकमत झाले अन त्या वादावर पडदा पडला तो पर्यत गावात काहीतरी वेगळेच घडल्याची चर्चा तालुकाभर पसरली होती परंतु पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पी एस आय दिपक मेढे ऐ एस आय सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे भारत तमनर नंदु लोखंडे होमगार्ड अजय भागवत तसेच गावातील शरद नवले सुनिल मुथा अभिषेक खंडागळे रविंद्र खटोड एकनाथ नागले देविदास देसाई प्रफुल्ल डावरे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली . (सामाजिक जिवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आलेल्या माहीतीची पुर्ण खात्री करुनच पुढील पाऊल उचलावे चुकीच्या माहीतीमुळे चांगले काम करतानाही अनर्थ घडू शकतो याची जाण कार्यकर्त्यांनी ठेवावी -सुनिल मुथा बेलापुर पत्रकार संघ)