रेणुकादेवी आश्रमात त्रिदिनात्मक सोहळा…..

वडाळा महादेव[ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्रीक्षेत्र रेणुका देवी आश्रमात रविवार पासुन तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यामध्ये आश्रमाचे संस्थापक रेवणनाथ महाराज यांचा ७८ वा जयंती सोहळा तसेच
नाथषष्ठी निमित्ताने पैठण येथे जाणाऱ्या पायी दिंडी स्वागत सोहळा यांचा समावेश आहे.

रविवार दिनांक २४ मार्च रोजी (हुताशनी पौर्णिमा) सायंकाळी सात वाजता ब्रह्मलिन मौनयोगी सद्गुरू रेवणनाथ महाराज यांच्या जन्म जयंतीनिमित्त चरण पादुका अभिषेक चि प्रणव प्रशांत जोशी यांच्या हस्ते होईल नंतर
दिपऔक्षण होणार आहे. सौ व श्री आनंद वायकर यांच्या हस्ते महाआरती
होणार आहे.
सोमवार दि २५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मुसळगाव‌ ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी स्वागत सोहळा संपन्न होत आहे यावेळी बोंबले पाटील परिवार शिरसगाव यांच्या हस्ते महाआरती संपन्न होणार आहे.
मंगळवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता काकडवाडी ते पैठण पायी दिंडी सोहळा (वर्ष ४६ वे) यांचा स्वागत सोहळा संपन्न होत आहे.दोनही दिवशी हरिपाठ व प्रवचन महाआरती महाप्रसाद वितरण होणार आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!