नामदार विखे कडून मुठेवाडगाव गावठाण विस्तारासाठी
(साडेसात एकर जमीन)

माळवाडगाव ( प्रतिनिधी–केशव आसने )

महाराष्ट्र राज्याचे महसूल व अहिल्यादेवी नगरचे पालकमंत्री माननीय नामदार श्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब व अहिल्यादेवी नगर दक्षिणेचे खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून मुठेवाडगाव ग्रामपंचायत साठी शेती महामंडळाची गट क्र. 3 मधील गावठाण विस्तारासाठी साडेतीन एकर, शासकीय घरकुलासाठी दीड एकर, पाणीपुरवठा योजनेसाठी अडीच एकर अशी एकूण साडेसात एकर जमीन शासन निर्णय क्र.मशेम -/ प्र.क्र.११/ल – ७ दि.१३मार्च २०२४ रोजी मंजूर करण्यात आली आहे.

जी जमीन मिळाली आहे त्याचे प्रमाणपत्र खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील,तालुका अध्यक्ष दीपक(अण्णा) पटारे श्रीरामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन दिनकर, उपजिल्हाधिकारी कोळेकर साहेब,खरमाळे साहेब,प्रांतअधिकारी किरण सावंत साहेब, तहसीलदार मिलिंद वाघ साहेब,गटविकास अधिकारी सिनारे साहेब शेती महामंडळाच्या महिला अधिकारी यांचा हस्ते स्वीकारताना डॉ शंकरराव मुठे,मा सरपंच शिवाजी मुठे, शिवसेना तालुका उपप्रमुख लक्ष्मण पाचपिंड ग्रामसेवक सुधीर उंडे, ग्रामपंचायत,सोसायटी सदस्य व ग्रामस्थ यांना प्रदान करण्यात आला.
मुठेवाडगाव येथे प्रमाणपत्राचे स्वागत डीजे व फटाकडे वाजून व गावातील श्री संत तुळशीराम महाराज यांच्या चरणी अर्पण करून मंदिराचे पुजारी किसन महाराज लोखंडे यांच्या हस्ते पूजा करून व पेढे वाटून ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामस्थांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी शेती महामंडळाची जमीन ग्राम पंचायतला मिळून देण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी पोलीस पाटील वसंतराव मुठे, ग्रामपंचायत सदस्य अनिल मुठे,किशोर साठे, लंका मुठे,संगीता मुठे, भाजप महिला तालुका उपअध्यक्ष वैशाली दौंड, सोसायटी सदस्य भागवत मुठे,संभाजी गोसावी, शांताराम मुठे, बाबासाहेब मुठे,शरद जासूद,सुरेश मुठे,मारुती जासूद,आत्माराम मुठे,निलकंठ मुठे, रामेश्वर मुठे, विश्वास क्षीरसागर साईनाथ मुठे, व भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!