व्हाँट्सअपच्या माध्यमातून वर्गणी गोळा करुन रस्त्यावर टाकला मुरुम
बेलापुर (प्रतिनिधी — देवीदास देसाई )-
व्हाँटस्अपच्या माध्यमातून निधी जमा करुन रस्त्यावर मुरुम टाकुन तो रस्ता वहातुकी योग्य करण्याची किमया श्रीरामपुर तालुक्यातील गळनिंब येथील एका अवलीयाने करुन दाखवीली आहे . गळनिंबच्या बंधाऱ्यावरुन संक्रांपुर तालुका राहुरी येथे ये जा करण्यासाठी शेतकरी जिजाबापु वडीतके यांनी आपल्या शेतातुन रस्ता दिला होता परंतु पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होवुन दळण वळणास अडथळे येत होते. गळनिंब येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे व वृक्षमित्र अजित देठे या रस्त्याने जात असताना त्यांनी पाहीले कि चिखलातुन जाताना दोन शाळकरी मुले पडली तसेच चिखलामुळे एक मोटारसायकल स्लिप झाली अध मोटारसायकल वरील दोघेही चिखलात पडले हे पाहून त्यांना कल्पना सुचली त्यांनी या रस्त्याने ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त दोनशे रुपये फोन पे करण्याची विनंती केली अन काही तासातच दहा ते अकरा हजार रुपयांचा निधी जमा झाला .मग शेरमाळे व देठे यांचाही उत्साह वाढला त्यांनी शेतकरी मुळा प्रवराचे माजी संचालक जिजाबापु वडीतके व जेसीबीचे, ट्रँक्टर मालक योगेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला चांगले कार्य पाहुन त्यांनीही मदत करण्याचा निर्णय घेतला मग या सर्वांच्या मदतीला धावुन आले बाळासाहेब माळी, सतीश देठे,शाम जाधव, बाळासाहेब वडीतके, मनोज तुपे, दत्तात्रय पांढरे, वैभव शिंदे, संदिप कचरे, कांतीलाल जगताप, शनेश्वर जगताप अन या सर्वांच्या परिश्रमातुन व शेतकरी, ग्रामस्थ यांनी दिलेल्या योगदानातुन संक्रांपुर बंधाऱ्यावरुन गळनिंबकडे जाणारा रस्ता दुरुस्त झाला लोकवर्गणी १३ हजार रुपये जमा झाली परंतु खर्च आला १५ हजार रुपये आणखी वर्गणी जमा झाली तर ठिक नाही तर परदमोड करुन हे काम पुर्ण करु असेही संदीप शेरमाळे यांनी सांगितले.