सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा अन्यथा काम बंद अंदोलन छेडणार – देसाई
मागण्या वरीष्ठांना कळविल्या, सर्व्हअर तातडीने सुरळीत होईल – मिलींदकुमार वाघ

    ( भोकर प्रतिनिधी — चंद्रकांत झुरंगे  )

 

सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानच्या ई पॉझ मशीनचे सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा, धान्य वितरणास मुदत वाढ द्या, गेल्या चार महिण्यांपासूनचे थकीत कमीशन द्या अन्यथा कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.
श्रीरामपूर तालुक्यात गेल्या महिण्यापासून मोफत धान्य लाभार्थी रेशनकार्ड धारकांच्या प्रत्येक सदस्याचे याच ई पॉझ मशीनवर ई के वाय सी करण्याचे आदेश आले त्याप्रमाणे कामकाजास सुरूवात झाली अन् ई पॉझ मशीन बाबतच्या तक्रारी सुरू झाल्या. ई के वाय सी करताना अनेकदा मशीन रिस्टार्ट होत आहे. अनेकदा सवर्हअर डावून होत आहे. लाभार्थीचा थम्स आला नाही तर प्रत्येक थम्सच्या वेळी आधार क्रमांक टाकावा लागत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपुर्वी आलेल्या नवीन व्हर्जन मध्ये प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागत आहे, प्रत्यक्षात जेथे दुकानदारांचा व लाभार्थींचा थम्स असतो तेथे पासवर्ड ची गरज नसताना केवळ मानसिक त्रास देण्यासाठी हा पासवर्ड टाकल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.
गेल्या महिण्यातील सर्व्हअरच्या तक्रारीरींच्या तुलनेत या महिण्यात सर्व्हअरच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने धान्य वितरणास हि मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून सर्व्हअर डावून मुळे हि यंत्रणाच कोलमडली आहे. दररोज दुकानदार दुकान उघडून बसत आहेत पण या सर्व्हअरच्या अडचणीमुळे लाभार्थी धान्यासाठी व ई के वाय सी करीता दुकानात चकरा मारत आहेत. पर्यायाने दुकानदार अन् लाभार्थीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहेत. या ई के वाय सी व धान्यासाठी अनेक लाभार्थींना आपल्या रोजंदारीला मुकावे लागत आहेत. पर्यायाने दुकानदार व लाभार्थीमध्ये हा वादाचा मुद्दा ठरत आहे.
या सर्व अडचणी सोडविण्यासाठी श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दि. 3 जुलै रोजी यात दुरूस्ती करण्याची मागणीचे निवेदन दिलेले असताना या सर्व्हअरच्या अडचणी वाढल्याने संतप्त दुकानदारांनी आता या सर्व्हअरमध्ये तातडीने दुरूस्ती न झाल्यास कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. त्याच बरोबर सर्व्हअर अडचणीमुळे अनेक दुकानदारांचे धान्य वितरण शिल्लक असल्याने हे धान्य वितरणास ऑगष्ट पर्यंत मुदतवाढ द्यावी व गेल्या चार महिण्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांना कमीशन मिळालेले नाही ते त्वरीत दुकानदारांना अदा करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, शहराधयक्ष प्रकाश गदीया, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड, चंद्रकांत गायकवाड, धनु झिरंगे, राजेंद्र वाघ आदिंसह तालुक्यातील दुकानदारांच्या सह्या आहेत.
ई पॉझ चे सर्व्हअर लवकरच सुरळीत होईल – तहसिलदार वाघ
सर्व्हअरच्या अडचणींसह दुकानदारांच्या सर्व अडचणी वरीष्ठांना कळविण्यात आल्या असून तातडीने सर्व्हअर दुरूस्तीच्या सुचना संबधीतांना देण्यात आल्या असून उर्वरीत अडचणी ही तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिले.
सर्व्हअर तातडीने दुरूस्ती न झाल्यास ई पॉझ मशीन शासनाकडे जमा करणार – देसाई, पठाण
प्रत्यक्षात अनेकदा रेशनकार्डधारक कुटूंबातील सर्व सदस्यांसह रेशन दुकानात ई के वाय सी करण्यासाठी व धान्य घेण्यासाठी येतात त्यावेळी सर्व्हअर डावून असल्याने दुकानदार व कार्डधारकांत चांगलेच वाद होतात अशा वेळी कार्डधारक दुकानदारांना विनाकारण शिव्याशाप देत असल्याने दुकानदार ही या प्रकारे त्रस्त झालेला असल्याने आमच्या अडचणी तातडीने न सुटल्यास व तातडीने सर्व्हअर दुरूस्ती होवून वितरण सुरळीत न झाल्यास लवकरच जिल्ह्यातील सर्व दुकानदार हे ई पॉझ मशीन शसनाकडे जमा करणार असल्याचे इशारा जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई व जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी दिला आहे.

सर्व्हअर अडचणी सोबत इतर अडचणींचे निवेदन तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई समवेत चंद्रकांत झुरंगे, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड आदिंसह दुकानदार दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!