संक्रांपुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न..

संक्रांपुर (प्रतिनिधी- देवीदास देसाई )

-संक्रापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन व्हा चेअरमन सर्व संचालक व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या वेळी आनंदाच्या शिधाचेही वितरण करण्यात आले . वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे चेअरमन श्री महेबूबभाई शेख हे होते यावेळी चेअरमन व व्हा चेअरमन संचालक मंडळानी संस्थेला स्वस्त धान्य दुकान सुरु करुन दिल्याबद्दल आभार मानले. या वेळी गौरी गणपती निमित्त शासनाने दिलेल्या आनंदाच्या शिधाचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .संस्था नफ्यात आणण्यासाठी काय केले पाहीजे यावर चर्चा झाली. सभेला माजी चेअरमन नबाजी जगताप कल्याण जगताप पत्रकार देविदास देसाई दादासाहेब जगताप , भरतरी नाथ सालबंदे जालिंदर सालबंदे बाळासाहेब चोखर ज्ञानदेव होन अर्जुन होन रामराव होन द्वारकनाथ चव्हाण बाबासाहेब जगताप राजेंद्र जगताप संजय जगताप कादर भाई शेख दावल भाई शेख चांद भाई शेख जालिंदर चव्हाण विजय रोकडे बबनराव खेमनर सिताबाई खेमनर बाळासाहेब बोरावके मिंलींद बोरवके इंद्रभान पांढरे कुंडलिक खेमनर त्र्यंबकराव जगताप पंढरीनाथ जगताप चंद्रभान जगताप भगीरथ रोकडे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!