अकारी पडित उपोषणकर्त्यांच्या आरोग्यास धोका आरोग्य विभागाचा अहवाल.

( श्रीरामपूर प्रतिनिधी –इमरान शेख )

आम्हाला शासनाच्या दारात मरू द्या किमान आमच्या मुलाबाळांना तरी जमिनी मिळतील अकारि पडितांची शासनास आर्त साद—- जिल्हाध्यक्ष अनिल औताडे.
श्रीरामपूर शिरसगाव प्रतिनिधी
श्रीरामपूर तहसील कचेरी मध्ये सुरू असलेल्याअकाररि पडित संघर्ष समितीचा उपोषणाचा आज सहावा दिवस उजाडला आहे. उपोषणकर्ते बाळासाहेब आसने अॅड सर्जेराव घोडे शालनताई झुरळे यांची प्रकृती खालावली असून त्यांची वजनामध्ये त्यांच्या लक्षणीय घट आली असल्याचे डॉक्टरने सांगितले तसेच त्यांची शुगर व बीपी ही कमी झालेला असल्याने त्यांना आता नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याचे डॉ कौस्तुभ शेवंते हेडकॉस्टेबल खेडकर
आरोग्य विभाग श्रीरामपूर यांनी पोलीस प्रशासनाला कळविले आहे परंतु उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आम्हाला उपोषण स्थळी उपचार द्या आम्ही येथून लिखी घेतल्याशिवाय हलणार नाही. आमच्या जीविताचे काहीही होओ परंतु आमच्या हक्काच्या जमिनी किमान आमच्या मुलाबाळांना तरी मिळतील अशी आर्त साद राज्य शासनाला घातली आहे. सदर उपोषणाबाबत उद्या १८/३/२०२४ रोजी प्रांत कार्यालयाला कुलूप ठोकून उपोषणाचा मार्ग बदलून जेलभरो सुरू करणार आहोत. १९१८ साली ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या तीस वर्षे कराराने जमिनी १९४८साली सोडणे गरजेचे होते परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेती हे शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असून ब्रिटिशांनी काढून घेतलेलं साधन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही आपल्याच सरकारने जमिनी बेकायदेशीर ताब्यात ठेवल्या ही बाबही लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी आहे यावरून स्वातंत्र्याच्या प्रश्नचिन्हावरही प्रश्न निर्माण होत आहे उपोषणाच्या सातव्या दिवशी ही जर शासनाच्या वतीने कुठलेही जबाबदार अधिकारी पदाधिकारी यांनी उपोषणाकडे असवेंदनशीलता दर्शविली गेली यावरून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळेच अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना व अकारि पडित संघर्ष समिती उद्या हजारोंच्या संख्येने प्रांत कार्यालयाला टाळे ठोकणारच आहे असा इशाराही शेतकरी संघटनेने व संघर्ष समितीने दिला आहे उपोषणाच्या सहाव्या दिवशीही जिल्हाध्यक्ष अनिल औताडे , श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख व खिर्डीचे लोकनियुक्त माजी सरपंच प्रभाकर कांबळे ,रामभाऊ रूपटक्के, सचिन वेताळ ,सुरेश वेताळ ,दत्तात्रेय औताडे, योगीराज वेताळ ,पांडुरंग पवार ,विलास कदम ,बाळासाहेब बकाल ,भास्कर शिंदे ,राजेंद्र गोसावी सुभाषराव देवरे ,सोपान नाईक, अण्णासाहेब चांदगुडे ,बबनराव वेताळ, ओम खैरे ,चंद्रकांत खैरे ज्ञानेश्वर शेळके प्रणव कडूस शरद आसने, सर्जेराव घोडे, बाळासाहेब आसने ,शालन ताई झुरळे ,सुनील आसने, गंगाधर वेताळ, बाबासाहेब वेताळ ,बापूसाहेब गोरे, प्रमोद आसने, अण्णासाहेब आसने, भगवान आसने, यमनाथ आसने आदी शेतकऱ्यांनी उपोषणास पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला आज अखेर तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून भाग घेतला व पाठिंबा दर्शविला आहे तरी यामुळे शासनाने किमान उद्या तरी आंदोलनाची दखल घेऊन लेखी आश्वासन द्यावे असे आवाहनही करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!