देशात रामराज्य आणण्याची जबाबदारी महिलांवर :- पद्मश्री पवार
प.पु. रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार २०२४
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम…
श्रीरामपुर ( प्रतिनिधी–राजेंद्र देसाई )
देशात रामराज्य आणण्याची जबाबदारी आता महिलांची असून पत्रकार संघाने नारी शक्ती चा सन्मान करून या जबाबदारीत भर घातली आहे. असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार २०२४ त्यांचे हस्ते देण्यात आला.
शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सवित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी च्या दिनी नारी शक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे हे होते. यावेळी शिवव्याख्याते प्रदीप कदम, पत्रकार संघाचे नवी मुंबई विभागीय अध्यक्ष दशरथ चव्हाण, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव उपस्थित होते.
सरला बेट चे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी पत्रकार हे समाजाचा आरसा असून महिला दिनी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचा केलेला सन्मान हा उपक्रम देखील आरसा म्हणून समाजापुढे राहिल असे सूतोवाच केले. पुरस्कार प्राप्त महिलांची जबाबदारी पुरस्काराने जास्त वाढली असून आपले कुटुंब गाव समाज व देशाप्रती योगदान द्यावे लागणार आहे .प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबात तसेच आजुबाजूला मोबाईल चा होणारा अतिरेक टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रस्ताविकात राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की, समाज कार्यात असणाऱ्या पत्रकाराची पत्नी उपेक्षित राहते. तिचा सन्मान झाला पाहिजे म्हणून हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी सामाजिक व शैक्षणिक कार्य रामचंद्र मारुती सुपेकर, ओतूर गावचे युवा उपसरपंच प्रशांत डुंबरे, आदिवासी भागात वैद्यकीय सेवा डॉ. सुभाष सोमण, शिक्षण अधिकारी दिलीप थोरे, युवा उद्योजक राहुल भास्कर पाबळकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. नारी शक्ती सन्मान सोहळ्यात शिर्डी च्या नगरसेविका सौ.वंदना राजेंद्र गोंदकर यांनी यावेळी महिला दिनाचे महत्व विषद केले.
शैक्षणिक कार्याबद्दल सौ. गिता राहणे, विडी कामगार चळवळी साठी च्या कार्याबद्दल सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे, विडी बांधून आपले तीन मुलांना शासकीय अधिकारी करणारी आदर्श माता सौ. शांता अशोक शेळके, यांच्या सह ४१ महिलांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संत कौस्तुभ पुरस्कार मध्ये संत तुकाराम मूर्ती, पगडी, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल देऊन महाराज यांना गौरविण्यात आले. तर महिलांना सन्मानपत्र, पैठणी, चांदीची लक्ष्मी ची मूर्ती, शाल देऊन सपती गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन सौ.गायत्री म्हस्के, श्री. ज्ञानेश्वर नवले यांनी केले तर आभार माजी जिल्हाध्यक्ष अनिल राहणे मानले.
चौकट :- [ राजकारण हे आमच काम नसून निवडणूक लढवणार ही बातमी खोटी आहे. शिर्डी लोकसभा राखीव मतदार संघ असल्याने हे शक्य नाही. पत्रकारांनी वस्तुस्थितीला धरून बातमी करावी.
:- महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज ]