अन्यथा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल — शेतकरी संघटना.

प्रतिनिधी –मुनीर सय्यद

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2023 -24 चे खरीप व रब्बी हंगाम पिकांचे पीकविमा नुकसानभरपाई 20 जुलै पर्यंत खात्यावर जमा करण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक श्री विनायक दीक्षित यांनी 20 जून रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय नगर येथे जिल्हा कृषी अधीक्षक श्री सुधाकर बोराळे यांनीआयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लेखी दिले होते परंतु अद्याप नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत अशा तक्रारी येत आहेत,31 जुलै पर्यंत पैसे खात्यावर जमा करण्यात यावेत अन्यथा 1 ऑगस्ट रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे टाळे ठोकण्याच आंदोलन करून न्याय मागण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष , शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी कडून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक श्री विनायक दीक्षित साहेब यांना रजिस्टर कुरिअर द्वारे पाठविण्यात आले आहे .निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे पा.यांनी दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!