डॉ राजेन्द्र डोंगरे यांना आरोग्य शिरोमणी पुरस्कार प्रदान – भूमी फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद महंत – रामगिरीजी महाराज

वडाळा महादेव [  प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]

ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र सराला बेट गोदाधाम या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील भूमिपुत्र डॉ राजेंद्र डोंगरे यांना भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य शिरोमणी पुरस्कार महंत रामगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून डॉ राजेंद्र डोंगरे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन आपण दिलेला आहे याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा कैलास पवार तसेच सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद व्यक्त करतो श्री डोंगरे यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली यापुढेही त्यांनी संत सेवा जनसेवा करावी असा शुभ संदेश महंत रामगिरीजी महाराज यांनी यावेळी दिला प्रसंगी आमदार रमेश बोरणारे .लहुजी कानडे प्राचार्य टी ई शेळके प्रा डॉ बाबुराव उपाध्ये प्रा शिवाजीराव बारगळ आरोग्य मित्र भीमराज बागुल पत्रकार राजेंद्र देसाई राजेंद्र जानराव भाऊसाहेब काळे दिनकर मगर माजी सरपंच कचरू महांकाळे अंबादास मगर विश्वस्त सचिन जगताप लक्ष्मीमाता मिल्कचे अध्यक्ष बाबासाहेब चिडे मधुकर महाराज कडलग तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते या पुरस्काराबद्दल परिसरातून डॉ डोंगरे यांचे अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!