हजरत सैलानी बाबा दरबार यांचा 65 वा संदल शरीफ 2024 चादर मिरवणूक मोठ्या जोमात उत्साहात संपन्न झाली.

 

श्रीरामपूर प्रतिनिधी-

 

चादर मिरवणूक ही हजरत सैलानी बाबा दरबार वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर या ठिकाणाहून ढोल ताशे नगारे तसेच सटाणा येथील म्युझिकल बँड वाद्यासह दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भगतसिंग चौक मेन रोड मार्गे जात असताना श्रीराम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी तसेच श्रीराम मंदिर उत्सव कमिटी यांनी देखील हजरत सैलानी बाबा यांच्या संदल चादर मिरवणूकीला भेट देऊन हिंदू मुस्लिम राम रहीम या सर्व गोष्टींचा शहरातील लोकांना श्रीरामपुराची जुनी परंपरा देखील दाखवून दिली

हजरत सैलानी बाबा दरबार उर्स कमिटी यांच्या वतीने श्रीरामपुरातील श्री राम मंदिर चौक या ठिकाणी श्रीरामांचा रामनवमीनिमित्त हरिपाठ चालू असल्याने उर्स कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवावीया व ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद तसेच कायदेशीर सल्लागार अजित डोखे यांनी मंदिराचे पावित्र्य राखत सदर श्रीराम मंदिर परिसरामध्ये ढोल ताशे नगारे तसेच म्युझिकल बँड बंद करून मिरवणूक शांतपणे गांधी चौकापर्यंत घेऊन गेलेत गांधी पुतळा पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी रोड मार्गे गिरमे चौक व हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी चादर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला

संदल शरीफ हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी दहा वाजता सर्व विधिवत सलाम दुवा पूजा करून बाबांच्या दर्गा मजांवर चढविण्यात आला

मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून सुव्यवस्थितपणे तसेच शिस्तबद्ध होण्यासाठी हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य सभासद तसेच भाविक भक्तगण शहरातील सुजाण नागरिक शहराची शान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस प्रशासन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बरमे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे व श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेज आज दि.१४/४/२०२४वार बुधवार रोजी सायंकाळी ५वाजता मशहुर कव्वाल चांद कादरी यांची कव्वाली होणार आहे ही कव्वाली ऐकण्याकरिता सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी वीनंती सैलानी बाबा भव्य उद्देशीय संस्था व उर्फ कमिटीच्या वतीने करण्यात आली..
हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!