निपाणी वडगाव येथील यात्रा उत्सवाची सांगता
वडाळा महादेव [ प्रतिनिधी -राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले निपाणी वडगाव येथील जागृत देवस्थान वीरभद्र व दावल मलिक यात्रा उत्सवाची लोकनाटय तमाशा हजेऱ्यांनी सांगता करण्यात आली यावेळी येथील विरभद्र देवस्थान व दावल मलिक दर्गाह याठिकाणी यात्रा उत्सव समितीच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी समिती तसेच भाविकांच्या वतीने मंदिर तसेच दर्गाह या ठिकाणी विधीवत पूजन करूण संदल व छबीना मिरवणूक काढण्यात आली नवसाला पावणारे देवस्थान असल्याने भाविकामधुन दिवसभर
नवसपुर्ती चा कार्यक्रम शेरणी न्याज पेढे वाटप करून करण्यात आला परिसरात निसर्गरम्य वातावरण असल्याने पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला परिसरात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली मिठाई खेळणी कपडे तसेच विवीध स्वरूपाच्या दुकाने याठिकाणी थाटले होते लोकनाट्य तमाशा ढवळपुरीकर यांच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नागरिकांनी पाऊस सुरू असताना देखील कार्यक्रमाचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी यात्रा उत्सव समिती निपाणी वडगाव समस्त ग्रामस्थ प्रयत्नशील होते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच पोसई दादाभाई मगरे यांचे मार्गदर्शनाखाली परिसरात पोलीस हवालदार संतोष परदेशी मच्छिंद्र शेलार शफिक शेख रघुवीर कारखिले पोलीस नाईक किरण टेकाळे पो कॉ वसीम शेख प्रवीण कांबळे गृह रक्षक दलाचे राजेंद्र देसाई संजय लाटे सुरेश गवळी जरीना सय्यद यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता