शांती ब्रह्म ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न.
प्रतिनिधी -ज्ञानेश्वर अनुसे
राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील खंडोबा मंदिर मराठी शाळेजवळ आज सकाळी दहा वाजता शांती ब्रह्म ह.भ.प. महंत भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पुण्यतिथी उत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट दिली.
यावेळी महंत ह भ प भास्करगिरीजी महाराज म्हणाले की, “संताचे पाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा” या जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे महाराजांच्या अंतकरणात संता विषयी जो भाव होता तो त्यांनी आपल्या अंतकरणातला भाव लेखणी द्वारे प्रगट केला. मी माझ्या जीवनामध्ये जे सुखी समाधानी आहे त्याचे एकच कारण आम्ही संतावरती विश्वास ठेवला आणि सर्व भावांनी मी त्यांचं दाष्यत्व पत्करलं. आपल्यालाही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून खरं जीवन सुखी समाधानी करायचे असेल तर संतावर आपली आढळ अटळ श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे.प्रत्येक व्यक्तीला सुखाची आवश्यकता आहे, परंतु ते का मिळत नाही ते गीतेने सांगितले आहे.”
तसेच दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी मल्हारी मार्तंड कथा आचार्य विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉक्टर शुभम महाराज कांडेकर यांच्या अमृतवाणीतून होणार आहे.
त्यासाठी पाथरे खुर्द व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे खंडोबा यात्रा उत्सव मंडळ व श्रीक्षेत्र देवगड भक्त परिवार यांनी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
यावेळी ह.भ.प. किसन महाराज पवार(मुकुंदराज संस्थान आंबेजोगाई, बीड), ह.भ.प. बाळासाहेब महाराज कानडे, ह.भ.प. राजाराम महाराज तुवर, ह.भ.प. सखाहारी महाराज जाधव, ह.भ.प. परशुराम महाराज जाधव, शंकर जाधव, तुकाराम लोखंडे, अमोल निमसे, गोरख टेकाळे, गंगाराम टेकाळे, संपत कातोरे, ज्ञानेश्वर शिरसाठ,ज्ञानेश्वर टेकाळे, प्रभाकर जाधव, संभाजी निमसे, सोमा कापसे, राजु गावडे, प्रविण जाधव, विष्णु काळे, अनिल काळे, कपिल जाधव, काका औटी, सुनिल काळे, अनिल जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, पांडू कलंके, समस्त गावकरी आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळ आणि भक्त परिवार बहुसंख्येने उपस्थित होते. पारायण कमिटी पाथरे आणि भजनी मंडळ यांच्या वतीने सूत्रसंचालन ह.भ.प. चंद्रकांत महाराज जाधव यांनी केले.