श्रीरामपूर तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत जाहीर.

श्रीरामपूर तालुक्यातील रिक्त असलेल्या २१ गावाच्या पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत काल गुरूवारी (दि.७) येथील प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली. याप्रसंगी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

तर तहसीलदार मिलींदकुमार वाघ, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे आदी उपस्थित होते.

सोडतीच्या प्रारंभी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय आदिक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तालुक्यातील २१ गावापैकी एकलहरे अनुसुचित जाती, फत्याबाद खुला प्रवर्ग,

गळनिंब खुला प्रवर्ग (महिला आरक्षित), कडीत बुद्रुक खुला प्रवर्ग, शिरसगाव इतर मागास प्रवर्ग, उंबरगाव विमुक्त मागास प्रवर्ग, मातापूर विमुक्त जाती (अ), मालुंजा बुद्रुक आर्थिक दुर्बल घटक (ईडब्लूएस),

भेर्डापूर विमुक्त जाती (अ), पढेगाव इतर मागास प्रवर्ग (महिला आरक्षित), कमालपूर खुला प्रवर्ग, माळवाडगाव खुला प्रवर्ग, गुजरवाडी इतर मागास प्रवर्ग, उंदिरगाव अनुसुचित जाती (महिला राखिव), गोंडेगाव इतर मागास प्रवर्ग (महिला राखीव),

नाऊर विमुक्त मागास प्रवर्ग (महिला राखीव), जाफराबाद खुला प्रवर्ग, निमगाव खैरी इतर मागास प्रवर्ग, सरला खुला प्रवर्ग, खंडाळा अनुसुचित जाती, वांगी खुला प्रवर्ग (महिला आरक्षित), असे आरक्षण पडले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!